Exemption Of Teachers Surveying From Academic Work Kolhapur Marathi News
Exemption Of Teachers Surveying From Academic Work Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक कामातून मुक्तता, "या' पालिकेने घेतला निर्णय

गणेश शिंदे

जयसिंगपूर : "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या शासनाच्या सर्वेक्षण मोहिमेत सहभागी असणाऱ्या शिक्षकांना पालिका प्रशासनाने दिलासा दिला आहे. सर्वेक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांकडून आता सर्वेक्षणाच्या काळात कोणतेही शैक्षणिक कार्य करून घेतले जाऊ नये, अशा सूचना प्रशासनाने शाळांना दिल्या आहेत. त्यामुळे आता केवळ सर्वेक्षणाचेच काम शिक्षकांना करावे लागणार आहे. 

मार्चपासून शहरातील नगरपालिका आणि खासगी शाळांच्या शिक्षकांकडून घरोघरी, तसेच प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण केले जात आहे. मात्र, यातून आम्हाला दिलासा द्यावा. इतर शिक्षकांनाही यामध्ये सहभागी करून घ्यावे. ऑनलाईन शिक्षण आणि सर्वेक्षणाच्या कामाचा ताण पडत असल्याच्या भावना शिक्षकांनी पालिका प्रशासनाला कळवल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने तातडीने या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडून सर्वेक्षणाच्या काळात कोणतेही शैक्षणिक काम करून घेऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. 

कोरोनात शिक्षकांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. घरोघरी सर्वेक्षण करून रुग्णांची माहिती मिळवताना सुविधांकडे दुर्लक्ष करून शिक्षकांनी हे काम प्रामाणिकपणे केले आहे. अशा शिक्षकांचा प्रशासनाने गौरवही केला आहे. मात्र, शैक्षणिक कार्य आणि सर्वेक्षण या दुहेरी जबाबदारीने ताण पडत असल्याची भूमिका शिक्षकांनी घेतल्यानंतर प्रशासनाने त्यांची शैक्षणिक कार्यातून मुक्तता करून दिलासा दिला आहे. सर्वेक्षणात सहभागी नसलेल्या शिक्षकांवर आता शाळेच्या सर्व वर्गांच्या ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी येणार आहे. शाळा पातळीवर हे नियोजन केले जाणार आहे. पालिका प्रशासनाने याबाबत शाळांना कळवून सर्वेक्षणातील शिक्षकांच्या शैक्षणिक कामातून मुक्तता करून दिलासा देण्याची भूमिका घेतली आहे. 

शिक्षकांना नेहमी सहकार्याची भूमिका
सर्वेक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाची दुहेरी जबाबदारी शिक्षकांवर होती. मात्र, प्रशासनाने त्यांना दिलासा देण्याच्या भावनेतून त्यांची ऑनलाईन शिक्षणाच्या कामातून मुक्तता करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या लढ्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून या कामात सहभागी झालेल्या शिक्षकांना नेहमी सहकार्याची भूमिका राहील. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या शासनाच्या सर्वेक्षण मोहिमेलाही शिक्षकांकडून सहकार्य लाभत आहे. 
- टिना गवळी, मुख्याधिकारी, जयसिंगपूर नगरपरिषद 

दृष्टिक्षेपात सर्वेक्षण 
- होणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण .....9381 
- लोकसंख्या ......................48,510 
- पथकांची संख्या ............... 48 
- पथकातील सदस्य .............144 
- शिक्षकांची संख्या ...............96

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT