experience the Halloween Moon information kolhapur
experience the Halloween Moon information kolhapur 
कोल्हापूर

तब्बल 19 वर्षांनी आलेला हॉलोवीन मून पाहा अन्‌ अनुभवा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एरव्ही पिठोरी चांदणं पृथ्वीवरील काही भागात पडते तेव्हा जमिनीवरील सुक्ष्म वस्तू ही दिसतात. हे पिठोरी चांदणे चंद्राचे असते. गार वारा अन्‌ जागोजागी सांडलेले चांदण्याची अनुभूती चराचर सृष्टीत दिसते. आज मात्र तब्बल 19 वर्षानंतर आकाशाच्या रंगमंचावर हॉलोवीन मूनचा योग आला अन्‌ कोल्हापूरवासिय नखशिखांत पिठोरी चांदण्यात भिजून गेले.

प्रत्येकाने हे हॉलोवीन मून पाहिला. अनेकांनी तर बायनॉक्‍युलर्स, मोठ्या-छोट्या दुर्बिणीतून हॉलोवीन मून पाहिला. आजच्या चंद्राचा हा नजारा सोशल नेटवर्किंग साईटस्‌वर अपलोड केला. 
आज प्रत्येकाची नजर हॉलोवीन मूनकडे वळली. काहींनी तर पटांगणावर, मोकळ्या माळरानांवर, गच्चीत, टेरेसवर जाऊन हॉलोवीन मूनचा अविष्कार पाहिला. खरेतर हॉलोवीन मून पाहणे ही आनंददायक घटना असली तरी ती 19 वर्षांनंतर दिसली आहे, हे विशेष. चंद्र बरोबर सहा वाजून सहा मिनिटांनी क्षितिजा वरती आला. चंद्र बिंब जसजसे वरती येऊ लागले तसतसे लोकांचे लक्ष वेधले गेले.

आकाशात ढगांच्या पुंजक्‍यांची दाटीवाटी नव्हती. त्यामुळे चंद्र बिंब पूर्णपणे पाहता आले. हा चंद्र 99 टक्के प्रकाशित होता. जेव्हा एका कॅलेंडर महिन्यामध्ये दोन पूर्ण चंद्र दिसतात. त्यावेळी त्याला "ब्लू मून' असे म्हणतात. ऑक्‍टोबर महिन्यामध्ये 31 आणि एक तारखेला पूर्ण चंद्र म्हणजे दोन पौर्णिमा आल्या होत्या. महिन्याच्या एक तारखेला जो चंद्र दिसत होता, त्याला "हार्वेस्ट मून' असे म्हणतात; तर त्याच महिन्यात 31 ऑक्‍टोबरला दिसणाऱ्या चंद्राला "ब्लू मून' असे म्हणतात. ब्लू मून म्हणजे चंद्र हा निळ्या रंगाचा दिसत नाही. काल दिसलेल्या चंद्रास "हॉलोवीन ब्लू' म्हणतात. असा योग बरोबर 19 वर्षांनी आला. 
 

""या पूर्वी असा योग 2001 मध्ये आला ला होता. यानंतर असा योग 2039 मध्ये येणार आहे. कालच्या "ब्लू मून' बरोबर सुर्यमालेतील चौथा ग्रह म्हणेज मंगळ ग्रह देखील क्षितिजावरती पाहता आला. ब्लू मून हा प्रत्येक अडीच वर्षानंतर पाहावयास मिळतो. यानंतर ऑगस्ट 2023, मे, 2026, डिसेंबर 2028 मध्ये "ब्लू मून' योग येईल.'' 
- प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर, पदार्थ विज्ञान व खगोल शास्त्र विभाग प्रमुख, विवेकानंद कालेज 
 

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT