Finally the former MLA took to the streets 
कोल्हापूर

अखेर माजी आमदार उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर ः शेतकरी, व्यावसायिक आणि नोकरदारांना शिरोळ तालुक्‍यातून सांगलीकडे जाण्यास अद्यापही कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून मज्जाव केला जात असल्याने रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रशासन गांधारीची भूमिका घेत असल्याने माजी आमदार उल्हास पाटील यांनी थेट आंदोलनाचेच हत्यार उपसले आहे. उद्यापासून (ता.12) शिरोळ तहसिल कार्यालयासमोर ते बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. याबाबत त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. 
श्री. पाटील यांनी सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शिरोळमधील नोकरदार, शेतकरी आणि व्यावसायिकांच्या व्यथा सांगितल्या होत्या. त्यानुसार सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांना पासेस दिला असताना कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष केले. शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांचे कंबरडे मोडले असताना जिल्हा प्रशासनाकडून केवळ खेळ सुरू असल्याचा आरोप करुन श्री पाटील यांनी शुक्रवारपासून शिरोळ तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा थेट जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन निवेदनाव्दारे दिला. 

शस्त्रक्रियेनंतर लगेच कार्यरत 
उल्हास पाटील यांच्या पाठीच्या आजारामुळे मंगळवारी शस्त्रक्रिया झाली. त्यांना पहायला येणाऱ्या लोकांकडून सांगलीकडे जाण्यास प्रशासन मज्जाव करत असल्याच्या तक्रारी सांगितल्या. यावर आजार आणि शस्त्रक्रियेची परवा न करता श्री. पाटील यांनी बुधवारी तडक कोल्हापूर गाठून शेतकरी, नोकरदार आणि व्यावसायिकांची गाऱ्हाणी मांडण्याचा प्रयत्न केला. पण याला विलंब होण्याची शक्‍यता लक्षात घेत त्यांनी शुक्रवारपासून थेट आंदोलनाचाच इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT