kolhapur
kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur : मनात उमटलेली मूर्ती देते आत्मविश्वासाचं बळ

संदीप खांडेकर

कोल्हापूर : ‘‘गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता. गणेशोत्सवात त्याची भक्तिभावाने सेवा करण्याची संधी मला मिळते. गणेश आगमनापूर्वी आरास करण्यात मी स्वतःला गुंतवून घेतो. माझी आई मला त्यासाठी मदत करते. मी सजावटीसाठी कोणते साहित्य आणायचे, हे तिला सांगतो आणि आकर्षक पद्धतीने सजावट करतो. भलेही मला मूर्ती दिसते कशी, हे पाहता येत नसले तरी माझ्या मनात उमटलेली मूर्ती मला आत्मविश्वास देणारी आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष कसा करावा, हे शिकवणारी आहे’’, मोरेवाडीत राहणारा दिव्यांग सम्राट अशोक राणे सांगत होता.

सध्या तो बेळगाव येथे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देत आहे. गणेशोत्सवाकरिता मोरेवाडी येथील निवासस्थानी आला होता. सम्राट दिव्यांग असला तरी त्याला शिक्षणाची लहानपणापासूनच गोडी. आई उषा राणे यांनी त्याच्या शिक्षणात कसूर ठेवली नाही. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. त्याने बंगळूरमधील महर्षी रमण्णा ॲकॅडमीतून पोल्ट्री, डेअरी, सेरीकल्चरचा डिप्लोमा केला. दिल्ली येथे त्याने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. त्यात त्याने ९६ टक्के गुण मिळविले. त्याने धावणे व ब्रेल लिपी स्पर्धेत अनेक बक्षिसेही पटकावली. त्याला मराठीसह इंग्लिश, कन्नड, तेलुगु, गुजराती भाषा अवगत आहेत.

विशेष म्हणजे तो बुद्धिदेवता गणेशाचा भक्त आहे. गणेशोत्सवात त्याच्या सजावटीसाठी तो खूप मेहनत घेतो. यंदा त्याने साध्या पद्धतीची सजावट केली. त्यासाठी तो थेट बेळगावहून आला होता. गणेशासाठी पाच दिवस वैविध्यपूर्ण रूपात त्यांनी पूजा बांधली होती. विविध फुलांनी मूर्ती सजवून पूजन केले. पाच दिवस गणेशाची आराधना करणाऱ्या गीतांचे सूर त्याच्या घरात घुमत होते. पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तीचे विसर्जन झाले पाहिजे, या मताचा तो आहे.

बुद्धीची देवता खूप काही शिकवणारी आहे. काळानुरूप तुम्ही तुमच्यात बदल केले पाहिजेत. मी दिव्यांग असलो तरी आयफोन वापरतो. कारण मी बुद्धीचा वापर कसा व कोठे करावा, हे शिकलो आहे. त्याला कारणही गणेशच आहे. त्याची मूर्ती मला सदैव ऊर्जा देते.

- सम्राट राणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT