Gangavesh, the international wrestler ...
Gangavesh, the international wrestler ... 
कोल्हापूर

'आरून फिरून नव्हे', आंतरराष्ट्रीय मल्ल घडवणारी 'गंगावेश'... 

संभाजी गंडमाळे

"आरून फिरून गंगावेस' अशी एक कोल्हापुरात प्रचलित म्हण आहे. मात्र, त्याच्याही पलीकडे जाऊन येथील श्री शाहू विजयी गंगावेस तालीम म्हणजे आजही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मल्ल घडवणारी गुणवंतांची खाण म्हणून प्रसिद्ध आहे. ही तालीम स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर होती.

मर्दानी खेळातील अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धांत तालीम राज्यात भारी ठरली होती, तर नव्या पिढीने आता येथे ही सारी परंपरा नेटाने पुढे नेताना विविध सामाजिक उपक्रमांवरही आवर्जून भर दिला आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून तालमीची देदीप्यमान परंपरा नव्या पिढीपर्यंत पोचवली जात आहे. 

श्री शाहू विजयी गंगावेस तालमीची स्थापना 1920 ची म्हणजेच तालमीचे हे शतकमहोत्सवी वर्ष. कुस्ती आणि मर्दानी खेळाबरोबरच तालमीचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान राहिले. ब्रिटिशांच्या विरोधात क्रांतिसिह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पत्री सरकारने उभारलेल्या सशस्त्र संघर्षाचे उपकेंद्र म्हणूनही तालमीला मोठी परंपरा आहे. या चळवळीचे नेते वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई आदींसह क्रांतिकारक मंडळी भूमिगत असताना त्यांचा मुक्काम तालमीत असायचा. स्वातंत्र्यसैनिक अण्णाप्पा पाडळकर यांनी तीस वर्षांहून अधिक काळ तालमीची जबाबदारी नेटाने सांभाळली. 

शाहूकालीन मल्ल ज्ञानोबा यादव, गणपत ससे, नारायण यादव आणि त्यानंतरच्या काळात बापू यादव, अण्णाप्पा पाडळकर, रायगोंडा पाटील, सदबा वास्कर, आंबेवाडीचे अतितकर पैलवान, परशराम सावंत (कुंडल), बळी गाडगीळ (घोटवडे), बळी पाटील (सुपे), नेमचंद लबाजे, भैरू वास्कर, सदू कोराणे, बाबूराव बचाटे, राजाराम वास्कर, राम चव्हाण, दया कराळे, दत्तू बिरजे, शंकर देवर्डेकर (तळाशी), रामचंद्र पाटील (कुडित्रे) आदी मल्लांनी तालमीचे नाव आणखी उंचावले. सादिक पंजाबी, बाला रफीक या पाकिस्तानी मल्लांनी येथे सराव केला. अलीकडच्या काळात गणपत खेडकर (डबल महाराष्ट्र केसरी), हिंदकेसरी दीनानाथसिंह, महाराष्ट्र केसरी अप्पा कदम, संभाजी पाटील- आसगावकर, रुस्तम- ए- हिंद हरिश्‍चंद्र बिराजदार, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे ही सर्व मंडळी याच तालमीत तयार झाली. 
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तयार झालेले मर्दानी खेळातील निष्णात शंकरराव मोरे (अमरापूरकर), दगडू मास्तर, कादर वस्ताद, बाबूराव बचाटे यांच्या पथकाने मुंबई येथे 1927 साली झालेल्या स्पर्धेत भाग घेऊन अजिंक्‍यपद पटकावले होते. 

दीडशेहून अधिक मल्लांचा सराव... 
गंगावेस तालीम म्हणजे आजही आश्‍वासक मल्लांची खाण म्हणून ओळखली जाते. वस्ताद विश्‍वास हारुगले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे दीडशेहून अधिक मल्ल रोज माती आणि मॅटवर सराव करतात. एखाद्या गावच्या जत्रेतील प्रतिष्ठेच्या लढतीपासून ते अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेल्या तालमीच्या मल्लांची नुसती यादी काढायची म्हंटलं तरी ती भली मोठी होईल आणि सध्याच्या काळातील हे एक दुर्मीळ असेच चित्र आहे. 

शूटिंगसाठी गंगावेस तालीमच
कुस्ती आणि कोल्हापूर हे एक अतूट समीकरण. साहजिकच सिनेमा, मालिका असोत किंवा अलीकडच्या काळातील शॉर्टफिल्म, वेबसिरीजमध्ये कुस्ती हा विषय असला की शूटिंगसाठी हमखास गंगावेस तालमीलाच पसंती दिली जाते. विविध उत्सवांबरोबरच राजर्षी शाहू महाराजांची जयंती तालमीतर्फे विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. तालमीच्या पैलवानांनी यंदा गिरोली, पोहाळे, जोतिबा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला आहे. विविध देशी झाडे येथे लावली असून, त्याच्या संवर्धनाची जबाबदारीही घेतली आहे.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT