Girl Suffer Phobia In Ardal Village Kolhapur Marathi News
Girl Suffer Phobia In Ardal Village Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

सायरनचा आवाज आणि तिची घालमेल...

अशोक तोरस्कर

उत्तूर : काही वर्षांपूर्वी तिच्या मोठ्या भावाचे निधन झाले. यानंतर अपघातात वडील वारले. या दोन्ही घटना तिच्या बालमनावर परिणाम करणाऱ्या ठरल्या. कुठेही खट्ट झाले तरी तिचा जीव कासावीस व्हायचा, ती घाबरून जायची. सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांची गाडी सायरन वाजवत गावात आली. काही तरी घडलंय म्हणून ती जिन्यातून टेरेसवर धावत सुटली. तिला धाप लागली, तिचा जीव घुटमळून ती घामाघूम झाली. तिला उपचाराकरिता दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, ती गतप्राण झाली आणि या घटनेमुळे सारा गाव हळहळला... 

आर्दाळ (ता. आजरा) येथील शर्वरी विलास बाबर (वय 15) ही मितभाषी शाळकरी मुलगी. तिच्यापेक्षा मोठा असलेला भाऊ शशांक याचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. पाठोपाठ 3-4 वर्षांनी वडिलांचा उत्तूरजवळ अपघातात मृत्यू झाला. या दोन्ही घटना तिच्या बाल मनावर आघात करणाऱ्या ठरल्या. यानंतर शर्वरी छोट्या छोट्या धक्‍क्‍यानेही घाबरून चक्कर येऊन कोसळू लागली. अशा 4-5 वेळा घटना घडल्या. मात्र, त्यावेळी प्राथमिक उपचाराने ती शुद्धीवर येऊन बरी व्हायची. 

सोमवारी दिवसभर गावाशेजारी असलेल्या हालेवाडी येथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने गाव लॉकडाउन होते. गावात निरव शांतता होती. यानंतर आर्दाळ गावातील दोन कोरोना संशयितांना घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्स गावात आली. रात्री गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तालुक्‍यातील अधिकारी सायरन वाजवत गावात आले. रात्रीच्या शांत काळात सायरनचा आवाज लोकांच्या मनात भीती निर्माण करणारा ठरला.

या वेळी शर्वरीलाही या सायरनच्या भीती वाटली व ती जिन्यावरून धावत टेरेसवर असणाऱ्या आपल्या आईकडे धावत सुटली आणि आपल्याला कसेतरी होतंय, असं म्हणत बेशुद्ध पडली. तिला खासगी वाहनाने गडहिंग्लज येथे दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, तेथे पोहचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तिच्या निधनाच्या बातमीने सारा गाव हळहळला. 

आई एकटीच... 
शर्वरीच्या आकस्मित जाण्याने शर्वरीच्या आईच्या वाट्याला एकटेपण आले. आधी पुत्र, नंतर पती आणि आता मुलगी नियतीने हिरावून नेली. यामुळे आई एकटी पडली आहे. त्यांना आधार देणारे शर्वरीचे काका कोरोनामुळे मुंबईतून येऊ शकले नाहीत. यामुळे त्यांना तिचे अंत्यदर्शन घेता आले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT