Grooming Center esakal
कोल्हापूर

प्राण्यांचे सौंदर्य खुलवा अन् मिळवा उत्पन्न; जातिवंत श्‍वान, मांजर पाळणाऱ्यांची संख्या वाढतेय, ग्रुमिंग सेंटरचा ट्रेंड

कोल्हापूरमध्ये देश-विदेशातील अनेक जातिवंत श्‍वान व मांजर (Cat) पाळणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

सुयोग घाटगे

विविध प्राण्यांचे ब्रीड समजून घेणे व त्या पद्धतीने उत्पादने वापराने, निगा राखणे गरजेचे असते. 

कोल्हापूर : लाखो रुपयांची उलाढाल असणाऱ्या डॉग ब्रीडिंग (Dog Breeding) व पेट शो व्यवसायात ग्रुमिंग सेंटर (Grooming Center) म्हणजेच सौंदर्य केंद्र महत्त्वाचे मानले जात आहे. अनेकांचे प्राण्यांविषयी आकर्षण व असणारी हौस यातून हा व्यवसाय बहरत आहे. हे सेंटर कसे असावे व कसे चालवावे यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षणासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे.

कोल्हापूरमध्ये देश-विदेशातील अनेक जातिवंत श्‍वान व मांजर (Cat) पाळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातूनच या प्राण्यांची निगा राखण्याचा व्यवसाय तेजीत आहे.  एका श्वानाला अंघोळ घालण्यासाठी किमान ३०० ते ५०० रुपये आकारले जातात. मात्र, निव्वळ इच्छा अथवा उत्पन्न हवे म्हणून हा व्यवसाय करता येत नाही. विविध प्राण्यांचे ब्रीड समजून घेणे व त्या पद्धतीने उत्पादने वापराने, निगा राखणे गरजेचे असते. 

शोसाठी हे महत्त्वाचे

  • प्राणी टापटीप असावा

  • प्राण्यांची ठेवण लक्षवेधी असावी

  • शरीर रचना, दात, नखे, कान हे सर्व तपासतात

  • शारीरिक क्षमता, चातुर्य व प्रशिक्षक,

  • मालकाचे निर्देश पाळण्याची क्षमता

आरोग्य

  • प्राण्यांचे केस सर्वाधिक महत्त्वाचा  घटक

  • याची योग्य निगा राखल्यास प्राण्यांचे  आरोग्य राहते उत्तम

  • योग्य स्वच्छता न राखल्यास त्वचेचे

  • विकार व  जंत होण्याच्या समस्या

  • अंघोळ, नखं कापून त्यांची स्वच्छता

  • कान योग्य पद्धतीने स्वच्छ करणे

मानसिक आरोग्य

  • पाळीव प्राणी हे अधिक माणसाळलेले असतात

  • निगा न राखल्यास मानसिक धक्का पोहोचण्याची शक्यता

  • त्यांना कुरवाळणे, खेळवणे गरजेचे

  • हे काम या ग्रूमिंग सेंटरमध्ये होते योग्य पद्धतीने

प्रशिक्षण कुठे

  1. परदेशातील अनेक विद्यापीठ, संस्थात पेट ग्रूमिंगचे प्रशिक्षण

  2. ऑनलाईन अभ्यासक्रमही उपलब्ध

  3. बंगळुरू व दिल्लीत खासगी संस्था देतात प्रशिक्षण

आवश्‍यक पात्रता

  1. उच्च शैक्षणिक पात्रतेची गरज नाही

  2. कुत्रे किंवा मांजरांच्या प्रजाती, स्वभाव वैशिष्ट्ये,

  3. शरीर​ रचना, प्राथमिक वैद्यकीय माहिती असणे गरजेचे

  4. संयम ​व एका जागी खूप वेळ उभे राहून काम करण्याची क्षमता

हे लक्षात घ्या... 

  • पाळीव प्राण्यांची काळजी हाच या व्यवसायाचा गाभा

  • उत्तम गुणवत्तेची उत्पादने, कौशल्यपूर्ण कर्मचारी आणि प्राण्यांची काळजी घेणारी सेवा महत्त्वाची

  • मालकांशी चांगले संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार सेवा द्यावी

  • नवीन तंत्रज्ञान आणि सौंदर्य उत्पादनांचा वापर करून सेवांची आधुनिकता हवी.

  • बाजारपेठेच्या वाढीमुळे हा व्यवसाय आकर्षक आणि फायद्याचा

कोणत्याही पाळीव प्राण्यांची निगा राखण्याची सुरुवात ही त्या पाळीव प्राण्याच्या मालकापासून होते. तरीही अत्यावश्यक काळजीसाठी ग्रुमिंग सेंटर खूप महत्त्वाचे आहेत. यामुळे प्राण्यांची मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

-कविता रेणुसे, मालक, ग्रुमिंग सेंटर

शोसाठी सहभागी होणाऱ्या प्राण्यासाठी ग्रुमिंग सेंटर आवश्यक आहे. यामुळे शोसाठी आवश्यक असणारी निगा राखण्यासाठी मदत मिळते. शोमध्ये विविध प्रकारे प्राण्यांचे परीक्षण होते. योग्य पद्धतीने निगा राखण्यात आलेल्या प्राण्यांना स्पर्धेत यश येण्याची शक्यता अधिक असते.

-शाहरुख मुजावर, कॅट ब्रीडर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT