Liver and Homeopathy
Liver and Homeopathyesakal

Health News : पित्ताअभावी अन्नपचन अशक्य असतं!

पित्ताअभावी अन्नपचन अशक्य असते. यकृताच्या निरोगी पेशींची एक विशिष्ट रचना व आकार असतो.
Published on
Summary

निसर्गाने दिलेले वरदान आणि अचूक होमिओपॅथिक औषधाची किमया ही होमिओपॅथी शास्त्राने मानवजातीस दिलेले वरदान आहे.

-डॉ. विश्वजित मानकर ,रत्नागिरी

शरीरामध्ये पित्तनिर्मितीचे कार्य करणारा अवयव म्हणजे लिव्हर. (यकृत) अन्नपचनासाठी प्रमाणित पित्ताची आवश्यकता असते. पित्ताअभावी अन्नपचन अशक्य असते. यकृताच्या निरोगी पेशींची एक विशिष्ट रचना व आकार असतो. निरनिराळ्या कारणांनी या यकृत (liver) पेशी निकामी होऊन यकृताच्या कार्यामध्ये बिघाड निर्माण होतो. त्यामागील कारणांचा विचार करीत असता सामान्यपणे जी कारणे निदर्शनास येतात त्यापैकी महत्त्‍वाचे कारण अतिरिक्त मद्यपान, आहारामधील पित्तकारक आणि तेलकट पदार्थांचे अतिरिक्त सेवन याला जोड पुरेशा निद्रेचा अभाव, अशी अनेक कारणे यामागे संभवतात. यकृतातील बिघाडाचे दृश्य परिणाम जलोदर (पोटामध्ये पाणी होणे) हे आढळते.

Liver and Homeopathy
Health News : घोरण्याची कारणे नक्की आहेत तरी काय? जाणून घ्या

होमिओपॅथी (Homeopathy) शास्त्राचे निराळेपण केवळ जलोदर. हेच रोगचिन्ह इतक्या सीमित स्वरूपात केले जात नाही तर लिव्हर सिरहोसिस आणि जलोदर याबरोबर मानसिक उद्‍भवणारी प्रचंड अस्वस्थता. या आजारात उद्‍भवणारे त्वचाविकार. या आजारामध्ये मलनिर्मिती बिघडलेली दिसते. वारंवार होणारे जुलाब आणि मळाचा बदललेला काळा रंग हे रोग लक्षण वरील लक्षणांसोबत सर्रास अढळते. पुरुष रुग्णाच्या अंडाशयामध्ये अतिरिक्त पाणीसंचय (Hydrocele) अशी अनेक जलोदराव्यतिरिक्तची रोग लक्षणे व चिन्हे विचारात घेतली जातात आणि त्याद्वारे लक्षणागणिक सिद्ध झालेली औषधांची योजना रुग्णाला पूर्ण रोगमुक्त देऊ शकते.

बऱ्यावेळा पूर्ण शाकाहारी आणि सात्त्‍विक आहार घेणाऱ्या स्त्री रुग्णांमध्येसुद्धा हा आजार निदर्शनास येतो. याचा विचार करता दररोजच्या अन्नातील पित्तकारक (आंबट) पदार्थांचे नियमित व अतिरिक्त सेवन, ही झाली या रोगांची कारणमीमांसा. आता होमिओपॅथी शास्त्रामध्ये या आजाराचा त्याच्या कारणांसह करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांचा विचार करू. सर्वप्रथम या रोगांची जी कारणे आहेत ती कारणे रुग्णापासून पूर्णतः पथ्य म्हणून बाजूला करणे. उदा. आहारातील तेल, तूप यांचा अत्यल्प वापर, आंबट व तिखट पदार्थ पूर्णतः वर्ज्य करणे, रुग्णास पूर्ण झोप घेण्याचा सल्ला देणे, मद्यपान वर्ज्य करणे आणि त्यासोबत रुग्णामध्ये निर्माण झालेली मानसिक लक्षणे, त्वचाविकार, जलोदर, अंडाशयातील पाण्याचा अतिरिक्त संचय या प्रत्येक रोग लक्षण व चिन्हासाठी स्वतंत्र औषधे सिद्ध झाली आहेत.

Liver and Homeopathy
Women Health News : स्त्रियांमध्ये उद्भवणारा श्वेतप्रदर अर्थात अंगावरून पांढरे जाणे; जाणून घ्या लक्षणे

ज्याचा इतर रोग लक्षणे, रोगाचे प्रकृतीमान, रुग्णाच्या आवडीनिवडी, वातावरणातील तापमानाचे रुग्णावर होणारे परिणाम. उदा. काही रुग्ण थंड प्रकृतीमानाचे असतात तर काही उष्ण प्रकृतीमानाचे असतात. रुग्णामधील रुग्ण अवस्थेत बदललेली मानसिक लक्षणे आणि रुग्णाचा मूळ स्वभाव याचबरोबर रुग्णाच्या जीवनातील गतकाळातील होऊन गेलेले आजार रुग्णाच्या जवळच्या रक्ताच्या नातेवाइकांमध्ये असलेले विकार या सर्व बाबींची सांगड घालून औषधांची निवड करावी लागते. रुग्णामध्ये होणारे आरोग्यदायी बदल उदा. बदललेल्या मानसिक अवस्थेमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, आळस, नैराश्य त्याचप्रमाणे त्वचाविकारामध्ये होणारे आरोग्यदायी बदल यामध्ये त्वचेवर येणारे कंड (खाज) उत्तरोत्तर कमी होत जाते.

Liver and Homeopathy
Eye Disease : 'काचबिंदूचे वेळेत निदान नाही झाले, तर कायमचे अंधत्व येऊ शकते!'

त्याचसोबत त्वचा मूळ निरोगी स्वरूपात बदलत जाते. जलोदरात लघवीचे प्रमाण वाढून पोटामध्ये हलकेपणा येतो. बिघडलेला मल सुधारू लागतो. जुलाब बंद होऊन मलाचा काळपट असणारा रंग बदलतो. त्यामध्ये आव पडत असल्यास ती पूर्णतः थांबते आणि पिवळ्या रंगाचा बांधीव मल निर्माण होतो. निरोगी मलाचे एक आणखी मुख्य लक्षण आहे जो मल पाण्यावर तरंगतो तो निरोगी मल समजावे. मानवी शरीरातील यकृत हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे रोग कारणे बाजूला करून जर अचूक औषधयोजना केली तर या यकृताच्या निरोगी पेशींची पुनर्निर्मिती हे नैसर्गिक वरदान प्राणीमात्रास मिळाले आहे. यकृतच्या पेशींची पुनर्निर्मिती या होमिओपॅथी शास्त्राला शक्य आहे. निसर्गाने दिलेले वरदान आणि अचूक होमिओपॅथिक औषधाची किमया ही होमिओपॅथी शास्त्राने मानवजातीस दिलेले वरदान आहे.

(लेखक होमिओपॅथी डॉक्टर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com