Gurupattabhishek Ceremony For Nul Tomorrow Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

नूलला उद्या गुरूपट्टाभिषेक सोहळा 

विठ्ठल चौगुले

नूल : श्री. सुरगीश्‍वर मठाचे मठाधिपती उपाचार्य रत्न श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचा नूलला (ता. गडहिंग्लज) उद्या (ता. 29) सहस्त्रचंद्र दर्शन व गुरूवारी (ता. 30) मठाचे नूतन उत्तराधिकारी प. पू. मंजुनाथ देवरू यांचा गुरूपट्टाभिषेक सोहळा होणार आहे. या वेळी रंभापूरी, उज्जैनी, केदार, श्रीशैल आणि काशी पीठाच्या जगद्‌गुरूंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

नूलचे सुरगीश्‍वर मठ महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संत बसवेश्‍वरांच्या काळापासून मठाला परंपरा आहे. नूलच्या जडणघडणीत मठाचे योगदान अमूल्य आहे. मठावर भाविकांची श्रद्धा आहे. आजपर्यंत मठाला 12 तेजस्वी शिवाचार्यांची परंपरा लाभली असून चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी बारावे मठाधीश आहेत. सुरगीश्‍वर मठ रंभापूरी पीठाची शाखा आहे. चंद्रशेखर स्वामीजींच्या आजपर्यंतच्या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्याने प्रेरीत झालेले भक्त देश-विदेशात विखुरले आहेत. 

सुरगीश्‍वर मठाचे बसवलिंगय्या स्वामी यांनी धर्मप्रसारासाठी सर्वत्र फिरत असताना नूल येथे येवून सुरगीश्‍वर मठाची स्थापना केली. बसवलिंगय्या स्वामीजींच्या महानिर्वाणानंतर त्यांचे शिष्य सुरगींद्र स्वामीजी यांनी या मठाची किर्ती पसरविली. चनबसय्या हे मठाचे तिसरे मठाधीश झाले.

जगज्योती बसवेश्‍वरांचे समकालीन शरणमुनी चंदय्या हे मठाधीश होवून गेले. चंदय्या स्वामीजींनी नदीतून मुळा आणून त्यापासून दोरी तयार करीत असत. ती दोरी विकून ते चरितार्थ चालवित. त्या दोरीला कन्नडमध्ये नूल म्हणतात. चंदय्या स्वामीजींच्या या कामामुळे गावाला नूल हे नाव पडले. त्यानंतर चिटकय्या उर्फ गिड्डलिंगय्या, नागलिंगय्या, उळवय्या स्वामी, गुरुसिद्दया, गुरुननय्या, गुरुसिद्दय्या हे सुरगीश्‍वर मठाचे मठाधीश झाले. गुरू-शिष्यांनी मठाचे महाद्वार बनविले. कलात्मक सुंदर माडी आज सुरगीश्‍वर मठाची शान आहे. गुरुसिद्दय्या स्वामीजीनीच आपल्या अंतसमयी चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींना आपले उत्तराधिकारी बनविले. दरम्यान, सहस्त्रचंद्र दर्शन व गुरूपट्टाभिषेक सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी होत आहे. 

चंद्रशेखर महास्वामीजींविषयी... 
हुक्केरी तालुक्‍यातील कणगला हे स्वामीजींचे जन्मस्थान. 1954 मध्ये त्यांनी मठाचे बारावे मठाधिपती म्हणून सूत्रे स्वीकारली. 1977 मध्ये त्यांचा गुरूपट्टाभिषेक सोहळा झाला. यमकनमर्डीच्या गुरूसिद्दया स्वामीजींच्या मार्गदर्शनाने त्यांनी विद्याभ्यासाचा आरंभ केला. बंगळूरच्या सरकारी संस्कृत विद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तेथे त्यांनी साहित्यलंकार ही पदवी मिळविली. काशिला त्यांनी उच्चशिक्षण घेतले. स्वामीजी बहुभाषिक आहेत. मठात त्यांनी गुरूकूल शिक्षणपद्धतीचा अवलंब केला. आजअखेर हजारहून अधिक जंगम विद्यार्थ्यांना पौरोहित्याचे वैदिक शिक्षण दिले. मठाच्या दोन कुपनलिका त्यांनी गावासाठी खुल्या केल्या आहेत. त्यांनी आपल्या कालावधीत दीड कोटी खर्चून मठाचा जीर्णोद्धार केला आहे. या जिर्णोद्धारीत मठाची वास्तूशांती रंभापूरी, उज्जैनी, केदार, श्रीशैल व काशी पिठातील जगद्‌गुरूंच्या उपस्थितीत पार पडली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT