Hasan Mushrif news esakal
कोल्हापूर

Hasan Mushrif: दोन बायका असतील तर काय करायचं?, कसा घेणार लाडकी बहीण योजनेचा लाभ? मुश्रीफांच्या वक्तव्यानंतर पिकला हशा

Hasan Mushrif Speaks on Ladki Bahin Yojana at Kolhapur Ichalkaranji Sabha : मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागा महायुतीला देण्याचे आवाहन केले. त्यांनी अजित पवार यांच्या बदललेल्या गुलाबी जॅकेटबद्दलही विधान केले.

Sandip Kapde

आगामी विधानसभा निवडणुकीत नेत आपला विजय निश्चित करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानामुळे सगळेच अचंबित झाले. "महायुतीच्या उमेदवाराचा बटन कचाकच दाबा, आम्ही तुमच्या घरातील जेवण तयार करून देतो," असे  मिश्किल विधान त्यांनी केले.

विधानसभेत विजयासाठी महायुतीची रणनीती-

हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, मुली आणि महिलांसाठी राज्यात भरघोस योजना आणल्या आहेत. आता फक्त तुमच्या घरातील जेवण तेवढे आम्हाला करायला सांगा, आम्ही ते सुद्धा करून देतो पण महायुतीच्या उमेदवाराचं बटन कचाकच दाबा, लोक म्हणतात लाडकी बहिण योजना बंद होईल, पैसे येणार नाहीत पण तुम्ही कचाकच बटन दाबले तर हे पैसे येतच राहतील," असे त्यांनी म्हटले. या विधानाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हसन मुश्रीफ यांचा महत्त्वाकांक्षी दावा-

मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागा महायुतीला देण्याचे आवाहन केले. त्यांनी अजित पवार यांच्या बदललेल्या गुलाबी जॅकेटबद्दलही विधान केले. "गुलाबी जॅकेट का? हे मला अजित दादांनी सांगितले नाही. पण बदललेला रंग उद्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा पक्ष बनवेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लाडकी बहीण योजनेवर मिश्किल टिप्पणी-

लोक विचारतात लाडकी बहीण योजनेवर दोन बायकांच्या बाबतीत काय करायचे, असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला. "दोन बायका असतील तर आवडत्या बायकोला या योजनांचा फायदा मिळवून द्या," असा टोला त्यांनी लगावला, त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अजित पवार यांच्या निवडणुकीच्या तयारीचा आराखडा

अजित पवार यांनी आपल्या विधानांमध्ये सांगितले की, "मधल्या काळात आपलं सरकार नव्हतं, तेव्हा सर्व आमदारांनी मला सांगितलं की आपण पुन्हा सत्तेत जायचं. हा निर्णय सर्व आमदारांनी घेतलेला आहे. राज्याच्या विकासासाठी आम्ही सत्तेत गेलो आणि अनेक योजना आणल्या." त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्र वाढवण्याची गरजही व्यक्त केली आणि आगामी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी

अजित पवार यांनी सांगितले की, "आता सर्व निवडणुका लागणार आहेत, ही आपली खरी कसोटी आहे. या निवडणुकांमध्ये अनेकांना संधी द्यायची आहे. जसा बळीराजा पावसाळा येण्याअगोदर तयारी करतो तशीच तयारी निवडणुका येणे अगोदर आपल्याला करायचे आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

Latest Maharashtra News Updates : एटीएममध्ये मदतीच्या नावाखाली तरुणाची फसवणूक

SCROLL FOR NEXT