heavy rain causes three gates open ratnagiri dam in kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकींग : पंचगंगेची पाणी पातळी वाढली 'इतक्या' फुटांनी

सुनिल पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसाने धडकी भरवली आहे. दोनच दिवसात राधानगरी धरणाचे तीन दरवाजे खुले झाले आहे. तर, पंचगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर आले असून पुन्हा एकदा पुराचे संकट ओढवले आहे. अजूनही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. 

कसबा बावडा येथे राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासात 6 फुटाने वाढली आहे. काल सकाळी दहाच्या सुमारास पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फुट होती. आज सकाळी दहा वाजता 33 फुट झाली आहे. तर, जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार तर पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. यामुळे पूराचे पाणी झपाट्याने वाढत आहे. सकाळी अकरापर्यंत जिल्ह्यात 35 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणाचे तीन  दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे पाणी पातळी आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ओढे, नाले तुंडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना पुन्हा एकदा पुर येण्याची धडकी भरली आहे. 

जिल्ह्यातील बंधाऱ्यावरील पाणी पातळी

राजाराम बंधारा पाणी पातळी : 33 फुट, नरसिंहवाडी - 44 शिरोळ - 45, इचलकंरजी - 71,  तेरवाड - 52

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT