Hoteliers in Kolhapur will not benefit from the state government's order to start hotels
Hoteliers in Kolhapur will not benefit from the state government's order to start hotels 
कोल्हापूर

शासनाचा 'हा' आदेश फसवाच कोल्हापुरातील हॉटेलमालकांची टीका...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - हॉटेल्स सुरू करण्यासंबंधीच्या राज्य शासनाच्या आदेशाचा कोल्हापुरातील हॉटेल चालकांना काडीचाही फायदा होणार नाही, अशा भावना हॉटेल मालकांच्या संघटनेने व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यभरातील हॉटेल मालकांशी संवाद साधला होता. त्यानंतर आज सायंकाळी त्यासंबंधीचा आदेश निघाला. चार महिन्यांच्या कालावधीनंतर सोशल डिस्टन्स राखून हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी मिळेल, अशी आशा होती. प्रत्यक्षात हॉटेल चालकांच्या पदरात निराशा पडली. ज्या हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था आहे, तेथेच उपहारगृहाला परवानगी दिली गेली आहे. तेथे राहण्यासाठी जे येतील त्यांनाच हॉटेलमधून जेवण देता येईल; अन्य लोकांसाठी हॉटेलचे दरवाजे बंदच राहतील.

लॉकडाउनमुळे हॉटेल मालक तसेच कर्मचारी अडचणीत आहेत. आजच्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळेल, असे वाटत होते; मात्र तूर्तास तशी परवानगी दिलेली नाही. लॉजिंगची व्यवस्था असलेली हॉटेल सुरू करण्यासाठी जाचक अटी आहेत. केवळ 33 टक्के आस्थापनेवर हॉटेल सुरू करता येतील. कोविडच्या आपत्ककालीन स्थिती अर्थात क्वारंनटाईनसाठी 67 टक्के खोल्या राखून ठेवाव्या लागतात. प्रवासी वाहतुकीवरील बंदीमुळे हॉटेलमध्ये राहण्यासाठी कोण येणार, असा प्रश्‍न आहे. ज्या 33 टक्के भागावर परवानगी दिली गेली आहे, तेथे राहणाऱ्या प्रवाशांच्या सॅनिटायजरसह हॅण्ड वॉश व्यवस्था हॉटेलचालकांनाच करावी लागणार आहे. ग्राहकाने खोली सोडल्यानंतर निर्जुंतुकीकरण करावे लागले. नंतरचे 24 तास खोली वापरण्यास मनाई असेल. सध्या वेळेच्या अधीन राहून पार्सल देण्यास हॉटेलचालकांना परवानगी दिली गेली आहे. कोल्हापुरात सुमारे हजारभर हॉटेलचालकांची लॉकडाउनमुळे अडचण झाली आहे. शासनाने लॉजिंगमध्ये 33 टक्के खोल्या भरतील इतक्‍या प्रवाश्‍यांना परवानगी दिली आहे. ज्या हॉटेल्समध्ये लॉजिंगची व्यवस्था आहे, तेथे जे प्रवाशी उतरतील त्यांनाच जेवण देता येईल. उपहारगृह सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. लॉकडाउनमुळे वेटर परगावी निघून गेले आहेत.

कोल्हापुरात आल्यानंतर तांबडा पांढऱ्याची चव घेतल्याशिवाय अनेकाचा पाय येथून निघत नाही. एप्रिल, मे तसेच जूनमध्ये हॉटेलचालकांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन केले. हॉटेल्सची चालण्याची वेळ सायंकाळी सात ते रात्री अकरा अशी आहे. शहरात पाच वाजताच दुकाने बंद होतात. रात्री काही हॉटेल्स सुरू असतात; मात्र तेथे पार्सल दिली जाते.

शासनाचा आजचा आदेश हॉटेलचालकांसाठी काहीही उपयोगचा नाही. ज्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आहेत तेथे जे प्रवाशी वास्तव्यास येतील. त्यांनाच उपहारगृहातून जेवण देता येईल. हॉटेल खुली करण्यासंबंधी स्पष्टीकरण शासनाने दिलेले नाही.
- आनंद माने, माजी अध्यक्ष हॉटेल मालक संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: कर्णधार ऋतुराजचं शानदार अर्धशतक; ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराटलाही टाकलं मागे

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT