kusti mallvidya mahasangh state wide convention organized in Kolhapur
kusti mallvidya mahasangh state wide convention organized in Kolhapur 
कोल्हापूर

गामा पैलवानांना भारतरत्न तर खाशाबाना पद्म पुरस्कार द्या

मतीन शेख

कोल्हापूर : केंद्र सरकारने जगत्तजेते मल्ल गामा पैलवान यांना भारतरत्न तर खाशाबा जाधव यांना मरनोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करावे, या मागणीचा ठराव महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या राज्यव्यापी महामेळावात आज करण्यात आला. आंबेवाडी येथील दत्त मंगल कार्यालयात हा मेळावा झाला.

अर्जुनवीर काका पवार अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले," गेल्या बारा वर्षांपासून कुस्तीच्या प्रसाराचे काम कुस्ती मल्लविद्या महासंघ करत आहे. राज्यभर सोशल मिडीयाच्या माध्यमातून तब्बल 52 देशात कुस्ती पोहचवण्याचे काम महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश मानुगडे यांनी केले. ही चळवळ अशीच पुढे चालत राहो.''

स्वागताध्यक्ष व आंतराराष्ट्रीय मल्ल पोलिस उपअधिक्षक राहुल आवारे म्हणाले "कुस्ती टिकविण्यासाठी प्रचार व प्रसाराचे काम महत्त्वाचे ते या महासंघाच्या माध्यमातून होत आहे.''

महासंघाचे संस्थापक गणेश मानुगडे म्हणाले," कुस्तीतल्या विचारांची देवान घेवान व्हावी व कुस्तीच्या विकासासाठी काय करता यावर येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. या चळवळीच्या माध्यमातूव गावागावांत, घराघरात कुस्ती पोहचवण्याचे कार्य झाले हे महासंघाचे यश आहे.'संघाचे राज्य प्रवक्ते संग्राम कांबळे प्रास्ताविकात म्हणाले," महासंघाने फेसबूक, युट्युबचा प्रभारी वापर केला. तसेच मासिक सुरु केले. सांगाती संस्थेच्या सहकार्याने 80 मल्लांना वैद्यकीय मदत केला आहे. तसेच शेंडगेवाडी, कुंडल, मुंबई येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्रे उभारली आहे. तसेच लॉकडाउन मध्ये 103 मान्यवरांच्या लाईव्ह मुलाखती घेण्यात आल्या.'' या मेळाव्यात महासंघाकडून तालुका स्तरावर पैलवानांसाठी विशेष वैद्यकीय मदत केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा केली गेली.

या मेळाव्यास ऑलिंपिकवीर बंडा पाटील रेठरेकर, महाराष्ट्र केसरी आप्पा कदम, हिंदकेसरी संतोष वेताळ, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर पुजारी, रणजित जाधव, वैभव लांडगे, आनंद धुमाळ, सागर साळुंखे, डॉ. प्रकाश पवार, राहूल चौगुले, दत्तात्रय ठाणेकर, दिलीप भरणे, पृथ्वीराज पवार, संभाजी पाटील, संभाजी ढाणे, राजाभाऊ देवकाते, युवराज केचे, धनाजी मदने, शिवलिंग शिखरे, अश्विनी बोराडे, रिमा शेळके, शिल्पा म्हात्रे, अनिता पाटील आदी उपस्थित होते.


मेळाव्यास मुंबई,पुणे,धुळे,नाशिक,जळगाव,औरंगाबाद,उस्मानाबाद सह राज्यभरातुन मल्ल व वस्ताद व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहिले होते. कोरोना महामारीमुळे कुस्तीचे फड बंद झाले परंतू या मेळाव्याच्या निमित्ताने कोल्हापुरात पैलवानांचा कुंभमेळाच भरल्याची प्रतिची आली होती.

महासंघाकडून सन्मान...

  • सम्राट लाल मातीचा - सिंकदर शेख
  • समाजभुषण पुरस्कार - सिद्धेश्वर गायकवाड
  • कुस्ती मल्लविद्या भुषण - बाबा राजे महाडीक
  • कुस्ती प्रचारक - राहूल जाधव,पप्पु पवार,शहाजी साळुंखे
  • कुस्ती मल्लविद्या सारथी - संग्राम कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT