immersion idols panchganga river should not allowed Prakash awade deepak kesarkar Ichalkaranji sakal
कोल्हापूर

Panchganga River : पंचगंगेत मूर्ती विसर्जनाला विरोधच

मुंबईतील बैठकीत स्पष्ट; मात्र प्रकाश आवाडे भूमिकेवर ठाम

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही परिस्थितीत पंचगंगा नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जित करता येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरून मांडण्यात आली, तर आमदार प्रकाश आवाडे पंचगंगा नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जित करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे वादावर सन्मानजनक तोडगा काढण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांनी आज जाहीर केले.

शहरात आमदार आवाडे यांच्यासह गणेश मंडळांनी पंचगंगा नदीमध्येच मूर्ती विसर्जनाची भूमिका घेतली आहे. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी त्यास ठाम विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने मात्र शहापूर खाणीमध्ये मूर्ती विसर्जित करण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनात श्री. केसरकर यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक झाली. त्यावर या प्रश्नावर चर्चा झाली. त्यावर कोणताच ठोस निर्णय न होता ‘पंचगंगा’ऐवजी पर्यायावर भर देण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

शासनाच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. त्यामुळे पंचगंगा नदीऐवजी पर्यायी ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्याबाबत उपाययोजना करण्याबाबत सुचविण्यात आले. त्यावर शहापूर खाणीवर चर्चा झाली; मात्र या खाणीत घाणेरडे पाणी असल्याचे आमदार आवाडे यांनी निदर्शनास आणून दिले. महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांनी खाणीतील पाण्याने नमुने तपासण्याबरोबरच स्वच्छता केली जाईल, असे या वेळी सांगितले.

पंचगंगेत अनेक ठिकाणी मूर्ती विसर्जित केल्या जातात; मात्र इचलकरंजीतच का मनाई केली जात आहे, असा सवालही या वेळी करण्यात आला. पंचगंगा नदीऐवजी सक्षम पर्याय तयार करण्याची सूचना शासनाच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये जास्तीत जास्त विसर्जन कुंड तयार करण्यासह अन्य काही पर्याय तयार करता येईल का, यावर चर्चा झाली; मात्र आमदार आवाडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने यावर तोडगा निघाला नाही.अखेर मंत्री केसरकर यांनी उच्च न्यायालयाचे आदेश पाहून याप्रश्नी सन्मानजनक तोडगा काढण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपवली आहे. बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, प्रांत डॉ. विकास खरात, पोलिस उपाधिक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह शासनाचा पर्यावरण विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT