Jaisingpur, Udgaonwala Dengue-Chikungunya Patients Kolhapur Marathi News
Jaisingpur, Udgaonwala Dengue-Chikungunya Patients Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

जयसिंगपूर, उदगांवला डेंगी-चिकनगुनियाचे थैमान

गणेश शिंदे

जयसिंगपूर: जयसिंगपूर, उदगांव, चिंचवाड येथे डेंगी-चिकनगुनियाने थैमान घातले आहे. डेंगीचे दहा, तर चिकनगुनीयाचे पन्नासहून अधिक रुग्ण सापडले. महिनाभरात उदगांव येथे चिकुनगुनियाचे शंभरहून अधिक तर डेंगीचे सात रुग्ण आढळले आहेत. चिंचवाड येथे पाचहून अधिक जणांना चिकुनगुणियाची लागण झाली आहे. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाकडून घरोघरी सर्व्हे करण्यात येत आहे. उदगांव येथे शंभरहून अधिक घरात डेंगीच्या अळया सापडल्या आहेत. 

उदगांव येथील महावीर कॉलनीसह गावभागात गेल्या महिन्यात चिकनगुनियाचे पन्नासहून अधिक रुग्ण सापडले होते. या आठवडयात पुन्हा चिकनगुनियाने डोके वर काढले असून उदगांव येथे शंभराहून अधिक जणांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. आठ दिवसात उदगांव येथील संत रोहीदासनगर, साखळे मळा व गावभाग येथे सात जणांना डेंगीची लागण झाली आहे. चिंचवाड येथे पाच जणांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळे उदगांव परीसरात भितीचे वातावरण आहे. 

डेंगी व चिकनगुनियाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागास दिली जात नसल्याने आरोग्य विभागाची अडचण झाली आहे. उदगांव परीसरात घरोघरी सर्व्हे करण्यात येत आहे. उदगांव येथे अ व ब आरोग्य उपकेंद्रातर्फे बारा अशासेविका यांच्यासह आरोग्य सेवक व्ही. एस. पाटील, के. सी. चौगुले, ए. एस. वास्के, केतकी गवळी व जी. बी. कुन्नुरे यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. 

आरोग्य विभागाकडून उदगावात सर्व्हे 
आरोग्य विभागाकडून उदगांव परीसरात सर्व्हे करण्यात येत आहे. यामध्ये एका लोकप्रतिनिधीच्या घरातील फ्रीज व पाण्याच्या टाकीत अळया सापडल्या. त्याचबरोबर गावातील विविध घरात सुमारे शंभराहून अधिक घरात फ्रीज व पाण्याच्या टाक्‍यामध्ये आळया सापडल्या आहेत. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT