Khude, the seller of dreams, finally surrendered
Khude, the seller of dreams, finally surrendered 
कोल्हापूर

स्वप्ने विकणारा खुडे अखेर शरण

राजेश मोरे

कोल्हापूर ः व्हिजन ऍग्रो प्रॉडक्‍टमधून 84 लाखांहून अधिकची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक संशयित विकास जयसिंग खुडे आज पोलिस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेली माहिती, मल्टिलेव्हल मार्केटिंग ड्रीम प्लॅनची स्वप्ने दाखवून व्हिजन ऍग्रो प्रॉडक्‍टस्‌मधून 84 लाख 56 हजारांची फसवणूकप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत व्हिजन ग्रीन ऍग्रो प्रॉडक्‍टस व व्ही. ऍण्ड के. ऍग्रोटेक प्रॉडक्‍टस प्रा. लिमिटेड कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक विकास जयसिंग खुडे (पोर्ले ता. पन्हाळा) याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. यात संशयित मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या विकास खुडे, प्रसाद आनंदराव पाटील, सुशील शिवाजी पाटील, डॉ. तुकाराम शंकर पाटील यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद शिक्षक राजू बळिराम सूर्यवंशी यांनी दिली. 
संशयित खुडेसह पाच जणांनी व्हिजन ग्रीन ऍग्रो व प्रॉडक्‍टस्‌ व व्ही. ऍन्ड के ऍग्रोटेक प्रॉडक्‍टस्‌ प्रा. लिमिटेड कंपनी सुरू करून नफ्याचे आमिष दाखवत अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली. व्हीनस कॉर्नर येथील मातोश्री प्लाझामध्ये कार्यालय होते. फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. यातील सुशील पाटीलवर विभागाने कारवाई केली. इतर संशयित पसार झाले होते. सूत्रधार खुडेचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्याचे मोबाईल लोकेशन वारंवार येरवडा (पुणे) परिसरात दाखवत होते. काही दिवसांपूर्वी तो उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच किमी अंतरावर ऑनलाईन भाजीचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली, पण तेथेही तो पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान, त्याची पत्नी विद्या हिने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने तो मंजूर केला; पण त्यासाठी पतीने शरण जाण्याची अट घातली. त्यानुसार आज संशयित खुडे आर्थिक गुन्हे शाखेत शरण आला. न्यायालयाने त्याला 11 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

SCROLL FOR NEXT