Kirit-Somaiya
Kirit-Somaiya sakal media
कोल्हापूर

कोल्हापुरात उद्या बंदी आदेश लागू: असा असेल किरीट सोमय्यांचा दौरा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमैय्या सोमवारी (ता.२०) येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या कारणासाठी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी जिल्हाबंदी आदेष लागू केला आहे. या आदेशानुसार सकाळी ५ वाजल्या पासून रात्री १२ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येण्यास बंदी आहे.

  प्रशासनाकडून आलेल्या बंदी आदेशातील माहितीनुसार, भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. १८ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत सोमैय्या यांचा निषेध करण्यात आला असून ते कोल्हापुरात आल्यास त्यांना दुष्परीणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच सोमैय्या यांच्या मार्गावर ट्रक, टँम्पो, जे.सी.बी उभे करून अडथळे निर्माण करून गनिमी काव्याने त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू असे मत व्यक्त केले आहे. सोमवारी (ता.२०) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेही जिल्ह्यात आगमन होणार असून त्यांच्या स्वागतासाठी १५ ते २० हजार जनसमुदाय येण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक वाहतूकला बाधा येऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात बंदी आदेष लागू करण्यात आला आहे. या आदेशान्वये जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येता येणार नाही. अशा पद्धतीने जे एकत्र येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असे आदेशात म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांचा दौरा

वेळ                     ठिकाण

सकाळी ७.३०        रेल्वे स्थानकावर आगमन.

८.००                    शासकीय विश्रामगृह

९.००                    अंबाबाई दर्शन

९.४५                    भाजपा कार्यालय भेट.

१०.०० ते ११.३०           कागलकडे प्रयाण

११.३० ते १२.३०           संताजी घोरपडे कारखान्याला बाहेरून भेट

१२.०० ते. १२.४५          पोलिस स्टेशन मुरगूड

१२.४५ ते १.००            मुरगूड पोलिस स्टेशन भेट.

१.१५ ते २.००             कोल्हापूरकडे प्रयाण

२.०० ते ३.००             भोजन

३.१५ ते ३.४५             पोलिस अधीक्षक भेट

४.०० ते ५.००             पत्रकार परिषद

५.१५ ते ५.४५            ग्रामिण पदाधीकारी बैठक

६.०० ते ६.३०             शहर पदाधिकारी बैठक

८.१५                    रेल्वे स्टेशनकडे प्रयाण

(भोजन, बैठका व पत्रकार परिषद हाॅटेल अयोध्या येथे होणार आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: शिवम दुबे गोलंदाजीला आला अन् चेन्नईला विकेटही मिळवून दिली; बेअरस्टोचं अर्धशतक हुकलं

SCROLL FOR NEXT