KMT slows down to start city busesin Kolhapur
KMT slows down to start city busesin Kolhapur 
कोल्हापूर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केएमटीचे "आस्ते कदम', डिझेलचे वाढते भाव डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते की परिस्थिती जैसे थे राहते यावरच केएमटीचे अर्थकारण अवंलबून राहणार आहे. एक एप्रिलपासून किमान 90 गाड्या रस्त्यावर आणण्याचे व्यवस्थापनाचे प्रयत्न होते पण कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर पुन्हा नियोजन विस्कळीत होणार यामुळे हे नियोजन मागे पडले आहे. 

शाळा महाविद्यालयांवर कोणता परिणाम होतो का हे ही पाहावे लागणार आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने सध्या 'आस्ते कदम' ची भुमिका घेतली आहे. केएमटीच्या सध्या 72 गाड्या रस्त्यावर धावतात. दिवसाला किमान पाच ते साडेपाच लाखापर्यंत उत्पन्न आहे. अजूनही बहुतांशी गाड्यात कोरोनाच्या धास्तीपोटी प्रवाशी बसायला तयार नसल्याचे चित्र आहे. किमान शंभर गाड्या रस्त्याव आल्या तरच आर्थिक गणित जमते सध्या डिझेलच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे रिकामी गाडी पळवून ही बाब परवडणारी नाही. केएमटीकडे सुमारे आठशे कर्मचारी आहेत. त्यांचा महिन्याचा पगार करताना तारेवरची कसरत होत आहे. 

डिझेलच्या वाढत्या किंमती हे सर्वात मोठे आव्हान आहे. तिकीट दरात कोणती वाढ झालेली नाही. डिझेल लीटरला ऐंशी रूपयापर्यंत असेल तर एका प्रवाश्‍याला अवघ्या आठ रूपयात सोडण्याची व्यवस्था केएमटी करते. 

एक एप्रिलपासून किमान 90 गाड्या रस्त्यावर आणून आर्थिक गणित सावरण्याचा प्रयत्न होता. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने विध्यार्थ्याचाही आर्थिक हातभार लावला, दैनंदिन उत्पन्न पाच ते साडेपाच लाखांच्या घरात गेले. 90 गाड्या धावल्यास यात आणखी वाढ होऊन ते किमान सात लाखापर्यंत नेण्याचा प्रयत्न होता. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पुन्हा केएमटी सेवेवर त्याचा परिणाम होईल हे गृहीत धरून एक एप्रिलचे नियोजन मागे पडले आहे. 

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे केएमटीचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. आपत्कालीन सेवेसाठी बसगाड्या वापरल्या गेल्या त्याचे शंभर टक्के पैसे अद्याप मिळालेले नाहीत. परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर बससेवा सुरळीत झाली ती आणखी मजबूत होत असतानाच कोरोनाच्या चर्चेमुळे पुन्हा ब्रेक लागला आहे. 

शाळा महाविद्यालयावर कोरोना वाढत्या रुग्णसंख्येचा काय परिणाम होतो यावर गाड्यांचे आगामी नियोजन ठरवावे लागेल. एक एप्रिलपासून 90 गाड्या रस्त्यावर धावतील या दृष्टीने नियोजन होते त्यावरही विचार करावा लागेल. 
पी. एन. गुरव, प्रकल्पाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT