kolhapur baburao painter create med in India first camera 
कोल्हापूर

भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा कोठे तयार झाला माहिती आहे का?

धनाजी सुर्वे

कोल्हापूर - आज एकवीसाव्या शतकात प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे आणि या मोबाईलमध्ये कॅमेरा अॅट्याच आहे. या कॅमेऱ्यातून सेल्फीपासून वेगवेगळ्या पोजमधील फोटो आपण काढत असतो. परंतु, दिवसातून किमान २० ते २५ वेळा आपण हाताळत असलेल्या या कॅमेऱ्याचा शोध कोठे लागला हे कोणाला माहिती आहे का?  उत्तर येईल नाही. शिवाय भारतीय बनावटीच्या पहिल्या कॅमेऱ्याचा शोध कोणी आणि कोठे लावला, याचे पण उत्तर नाही असेच येईल. या प्रश्वाची उत्तरे शोधायची कधी कोणी तसदी घेतली आहे का? याचेही उत्तर नाही, असेच येईल. 

कोडॅक कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत असलेल्या स्टिव्हन सॅसन यांनी १९७५ मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा शोध लावला. व्यावसायिक तत्वावरील पहिला कॅमेरा अमेरिकेत १९८८ मध्ये विक्रिसाठी उपलब्ध  झाला. त्यानंतर तो भारतात आला. कॅमेरा आणि फोटोग्रॅफी क्षेत्रातील त्यावेळची आघाडीची कंपनी कोडॅककडे डिजिटल कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान होतं. मात्र डिजिटल कॅमेरा बाजारात आणल्यास फोटोग्रॅफीसाठी वापरल्या जाणाऱ्या रोल्सच्या विक्रीवर परिणाम होईल, असा विचार करून कंपनीने डिजिटल कॅमेरा बाजारात आणला नाही. इथपर्यंतचीही माहिती काहिंना असेलच. पण भारतीय बनावटीच्या कॅमेऱ्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. 

कोल्हापुरच्या बाबुराव पेंटर व आनंदराव पेंटर या बंधूंनी बेल अँड हॉवेल कंपनीचा कॅमेरा खोलून, रिव्हर्स इंजिनीयरिंग पद्धतीने स्वत: मुव्ही कॅमेऱ्याचा शोध लावला. त्यानंतर कलामहर्षि बाबूराव पेंटरांनी १ डिसेंबर 1917 ला महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. पुढे कै. बाबूराव पेंटर यांनी याच कॅमेऱ्याचा वापर करून "गुड नाईट' नावाचा एक अवघा काही फूट लांबीचा लघूपट बनविला. या लघुपटात गजराबाई नावाच्या महिलेने भूमिका केली होती. आज हे नाव विस्मरणात गेले असले तरी भारतीय रूपेरी पडद्यावरची पहिली स्त्री गजराबाई या होत्या. त्यांच्यानंतर 1928 च्या सुमारास अनुसयाबाई आणि गुलाबबाई चित्रपटसृष्टीत आल्या. चित्रपटसृष्टीत आल्यामुळे या महिलांना घरदार सोडावे लागले. समाजाने जणू त्यांना बहिष्कृत केले होते. अभिनेत्री असल्या तरी या महिलांना कॅमेऱ्याचे पार्ट बनविण्यासाठी लेथ मशिनचे चाक फिरवावे लागले, स्टुडिओची शेड उभारताना माती ओढण्याचेही काम करावे लागले. 

बाबुराव पेंटर हे नामवंत चित्रकार, शिल्पकार,चित्रपट निर्मातो आणि दिग्दर्शक होते. त्यांनी बनविलेला पहिला सैरंध्री नावाचा चित्रपट पुण्यातील यार्यन थिएटरमध्ये ७ फेब्रुवारी १९२० रोजी दाखविला. या चित्रपटातील भीम व कीचक यांच्या द्वंद्व युध्दाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते. एवढे ते दृश्य कोणतेही ट्रिक सीन्स नसतानाही जिवंत चित्रीत झाले होते. यावरूनच ब्रिटीश सरकारने सेन्साॅर पद्धत सुरू केली. ती आजही सुरू आहे.  

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना याचिका वाचण्याचे आदेश देऊ शकत नाही; उच्च न्यायालयाचे निर्देश

Cab Driver Strike: तोडगा निघाला नाहीतर मुंबई, पुणे, नागपूरमध्ये...; खासगी कॅबचालकांचा इशारा

ED Sends Notice to South Indian Stars: साउथ इंडियन फिल्मस्टार विजय देवरकोंडा, राणा दग्गुबत्ती, प्रकाश राज 'ED'च्या रडारावर!

Prithvi Shaw: भारताच्या क्रिकेटरनं तब्बल १७ किलो वजन केलं कमी! पीटरसन म्हणतोय, 'पृथ्वी शॉला कोणीतरी हे दाखवा'

Crime News : पूर्ववैमनस्यातून एकाचा खून; मृतदेह टाकला उसाच्या शेतात, तोंडावर वर्मी घाव, मुलगा आहे सैन्य दलात

SCROLL FOR NEXT