kolhapur bjp workers demanded resignation of chandrakant patil samarjitsinh ghatge
kolhapur bjp workers demanded resignation of chandrakant patil samarjitsinh ghatge 
कोल्हापूर

चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा; भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच घरचा आहेर 

धनाजी सुर्वे

कोल्हापूर :  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत अशी मागणी भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून दोघांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 

सत्तेत असताना चंद्रकांत पाटील यांनी इतर पक्षात फोडाफोडी करून अनेकांना भाजपमध्ये घेतले. पण जुण्या जाणत्यांना डावलून नव्यांना व इतर पक्षातून आलेल्यांनाच पदे दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. त्यातच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक गांर्भियाने घेतली नसल्याने भाजपचा पराभव झाला. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष  समरजितसिंह घाटगे यांनी राजीनामा द्यावा, असा घरचा आहेर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांतदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  
 
चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांमधील लढतीमुळे पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची झाली होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजप याठिकाणी सहजपणे विजय मिळवेल असा दावा केला होता. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरूण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांचा दणदणीत मताधिक्याने पराभव केला होता. याशिवाय, भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या नागपूरमध्येही काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. हे दोन्ही पराभव राज्य भाजपसाठी मोठा धक्का होता. 

 चंद्रकांत पाटील हे राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना नेहमीच आव्हान देत असतात. मात्र त्यांच्या जिल्ह्यातून भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या नेतृत्त्वाला आव्हान दिले आहे. त्यामुळे आपल्या विरोधकांना अंगावर घेणारे चंद्रकांत पाटील घरातील हे आव्हान कसे थोपवणार, याची चर्चा सुरू झााली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT