kolhapur collector
kolhapur collector 
कोल्हापूर

अन् कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:च तपासल्या रुग्णवाहिका...

सुनील पाटील

कोल्हापूर - कसबा बावड्यातील कोरोनाची लागण झालेली महिला रुग्णवाहिकेतून कोल्हापूरमध्ये आली. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) टोल नाक्‍यावरुन पोलीसांचा बंदोबस्त असतानाही कोल्हापूरात लोक येतातच कसे? हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वत:च किणी टोल नाक्‍यावर जावून पाहणी केली. तसेच, अत्यावश्‍यक सेवेची वाहने व रुग्णवाहिकेची तपासणी केली. तसेच, असा कोण व्यक्ति आला किंवा त्याच्याकडे प्रमाणपत्र जरी असले तरीही त्याला संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीसांना दिले.

रुग्णवाहिकेतून बनावट आरोग्य प्रमाणपत्र घेवून किंवा बोगस पासवर कोल्हापूरात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वत: किणी टोलनाक्‍यावर जावून अत्यावश्‍यक सेवा वाहन, ट्रक व रुग्णवाहिकेची तपासणी केली. यांच्याकडून दाखवले जाणारे पास तसेच प्रमाणपत्रही त्यांनी तपासणी केली. 

रुग्णवाहिकेचा चुकीचा वापर

कोल्हापूर जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांना बंदी घातली आहे. किणी टोल नाका, कर्नाटक, सांगली, सिंधुदुर्ग येथील सर्व सिमा बंद केल्या आहेत. तरीही, मुंबई, पूणे, सातारा, कराड येथून लोक विविध कारणे सांगून किंवा खोटे पास दाखवून कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत. अशाच मार्गाने कसबा बावडा येथील एक महिला साताऱ्याहून रुग्णवाहिकेतून कोल्हापूरमध्ये आली. ऐवढेच नव्हे तर खोटे पास यामध्ये रुग्णवाहिकेचा चुकीचा वापर केल्याप्रकरणी रुग्वाहिकेच्या चालक आणि मालकावर गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, पोलीस बंदोबस्त असतानाही चुकीचे पास दाखवून किंवा रुग्णवाहिकेतून कोल्हापूरामध्ये लोक येतात कसे?यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनीच किणी टोल नाक्‍यावर काही रुग्णवाहिकेची, अत्यावश्‍यक सेवेसाठी असणाऱ्या वाहनांची तपासणी केली. पोलीसांशी चर्चा करुन सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या. 

पोलीस कारवाई करावी : जिल्हाधिकारी 

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या आणि बाहेरून आलेल्या प्रत्येकाची कोरोना तपासणीचे नमूने घ्यावेत. तसेच त्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रांत ठेवावे. जो नमुने देणार नाही किंवा अलगीकरण केंद्रात जाणार नाही, त्यांच्यावर तातडीने पोलीस कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी दौलत असे आदेशही श्री देसाई यांनी दिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT