Kolhapur-Flood 
कोल्हापूर

पूररेषेचा होणार अभ्यास ; जाणकार व तज्ज्ञांची समिती नियुक्त

जिल्हा प्रशासनाकडून नियोजन; जाणकार व तज्ज्ञांची समितीही नियुक्त केली जाणार

सुनील पाटील

कोल्हापूर : धरणाचे दरवाजे खुले न होता केवळ अतिवृष्टीमुळेच तीन दिवसांत जिल्ह्यात पुराने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. भविष्यातही याचा मोठा फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे, पूररेषेचा नव्याने अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त केली जाणार आहे. पूररेषा कशी असावी किंवा कुठंपर्यंत असावी, याबद्दल अनेक मते आहेत. त्यामुळे पूररेषेचा नव्याने अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.

कोल्हापूर शहर विकास आराखड्यात पंचगंगा नदीच्या पूररेषेत बदल केला आहे. नदीच्या ज्या ठिकाणी पूररेषा असायला हवी त्या ठिकाणी दिसून येत नाहीत. पाटबंधारे विभागाने ज्या ठिकाणी पूररेषा हवी त्यापेक्षा निम्म्याने कमी केल्याने पुराचे पाणी प्रवाहित होण्यास अडथळे येत आहेत. पूररेषा कमी केल्यामुळे अवास्तव आणि बेकायदेशीर बांधकामांना चालना मिळाल्याची टीका जाणकारांकडून होत आहे. हा महापूर धरणामुळे नव्हे, तर शहरातील अनधिकृत बांधकाम, रेडझोन, ब्लूझोनमधील बांधकामे, नदी, ओढे, नाल्यांवर केलेली अतिक्रमणे आणि त्यावरील बांधकामांमुळेच आल्याचा सूर शहरातून उमटत आहे. याची राज्य सरकारनेही गांभीर्याने दखल घेतली आहे.

मोठमोठे प्रकल्प, मॉल, मोठी सांस्कृतिक भवन नदीकाठीच मोठा भराव टाकून बांधली आहेत. याचाच परिणाम म्हणून यंदा राधानगरी धरणाचा एकही दरवाजा न उघडता कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी तब्बल ५६ फुटांवर गेली. कोल्हापूर शहरासाठीच नव्हे, तर नदीकाठच्या सर्वच गावांना ही धोक्‍याची घंटा आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाकडून पूररेषेचा अभ्यास केला जाणार आहे.

या बाबींचा होणार अभ्यास

पुराचे पाणी कुठे येते, धरणांचे सर्व दरवाजे सोडल्यानंतर पाणी पातळी किती असते? कोयना, अलमट्टी धरणांच्या साठवणूक आणि पाण्याच्या विसर्गाचा काय परिणाम होतो? याशिवाय, शहरातील चुकीची बांधकामे, ज्या ठिकाणी पुराचे पाणी प्रवाहित होणे अपेक्षित आहे, अशा ठिकाणीच मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते, यावर कोणता पर्याय काढला जाऊ शकतो, याचाही अभ्यास केला जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासन सर्व विभागांकडून माहिती घेत आहे. तसेच, यातील जाणकार आणि तज्ज्ञांची समितीही नियुक्त करण्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

Shraddha Bhosale : कुटुंब मूळचे गुजरातचे, जन्म मुंबईत, शिक्षण अमेरिकेत अन् सासर कोकणात; कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले? भाजपनं दिलीय उमेदवारी

‘कसाब बिर्याणी मागतोय’ हा ‘माझाच फंडा’! खासदार ॲड. उज्ज्वल निकम; प्रकट मुलाखतीत उलगडले अनेक किस्से..

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT