Jotiba Dongar
Jotiba Dongar sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : ‘जोतिबा’चा मुख्य रस्ता खचला

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरच्या मुख्य रस्त्यावरील पाण्याचा टाका भागातील रस्ता पावसामुळे खचण्यास सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून दोन दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. सध्या डोंगराकडे जाणारी सर्व वाहतूक गायमुख तलावमार्गे सुरू आहे. पाण्याचा टाका या भागात चार-पाच वर्षांपासून रस्ता तुटून जातो. यंदाही हा रस्ता खचण्याचा धोका आहे.

संभाव्य धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. वाहने जाऊ नयेत म्हणून मुरमाची चर मारून रस्ता बंद केला आहे. जोतिबा डोंगरावर सतत पावसाची रिपरिप असते. तसेच पाण्यात टाका भागात पाणी साचत असल्याने दलदल होते. परिणामी, रस्ता तुटून जातो. या ठिकाणी सलग तीन वर्षे झाले रस्ता तुटून जात आहे. त्यामुळे रस्त्याची तज्ज्ञांमार्फत पाहणी करणे गरजेचे आहे.

सध्या गायमुखमार्गे वाहतूक सुरू असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मुरमामुळे काही ठिकाणी तर चिखलाचे साम्राज्य आहे. चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात घडतात. त्यामुळे कायमस्वरूपी मुख्य रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: संपूर्ण अग्रवाल कुटुंब कोठडीत! कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक

EXit Poll 2024: भारतात कधी झाली एक्झिट पोलची सुरूवात? 88 वर्षांपूर्वी 'या' देशात जगात पहिल्यांदाच घेण्यात आले होते EXIT Poll

Gas Cylinder : मतदानाच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्यांना गिफ्ट! गॅस सिलिंडर झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

Latest Marathi News Live Update: लालू यादव यांनी पत्नी आणि मुलीसह पाटण्यात केले मतदान

First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

SCROLL FOR NEXT