Gas Cylinder : मतदानाच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्यांना गिफ्ट! गॅस सिलिंडर झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

Reduction in gas cylinder price: किंमतीमधील ही घट फक्त व्यावसायिक सिलिंडरसाठी असणार आहे. घरगुती सिलिंडरसाठी तूर्तास कोणताही दिलासा नसून ते जुन्याच दरांमध्ये मिळतील.
Gas Cylinder
Gas Cylinder

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना सिलिंडर वापरकर्त्यांना गिफ्ट देण्यात आले आहे. ऑईल मार्केटिंग कंपनीने एलपीजी सिलिंडरच्या किंमती ७२ रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा म्हणाला लागेल. १ जूनपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये ६९.५० रुपये, कोलकातामध्ये ७२ रुपये, मुंबईमध्ये ६९.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ७०.५० रुपये स्वस्त झाला आहे. किंमतीमधील ही घट फक्त व्यावसायिक सिलिंडरसाठी असणार आहे. घरगुती सिलिंडरसाठी तूर्तास कोणताही दिलासा नसून ते जुन्याच दरांमध्ये मिळतील.

Gas Cylinder
Naach Ga Ghuma: कौटुंबिक विनोदी चित्रपट; नात्याची गंमतीशीर गोष्ट मांडणारा ‘नाच गं घुमा’

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहेत. त्यातच १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडर वापरकर्त्यांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. दिल्लीमध्ये १७४५.५९ रुपयांना सिलिंडर मिळत होता तो आता १६७६ रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये १८५९ रुपयांना मिळणारे सिलिंडर १७८७ रुपयांना मिळेल. विशेष म्हणजे आज पश्चिम बंगालमध्ये मतदान आहे.

Gas Cylinder
Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

मुंबईमध्ये कालपर्यंत १६९८.५० रुपयांना असणारे सिलिंडरआजपासून १६२९ रुपयांना मिळेल. चेन्नईत सिलिंडर १८४०.५० रुपयांना मिळेल, तो आधी १९११ रुपयांना मिळत होता. त्यामुळे १९ किलो सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या लोकांनासाठी ही आनंदाची गोष्ट मानावी लागेल.

योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये गॅस सिलिंडरची किंमत १८४६ रुपये असेल. मात्र, १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८६५ रुपये आहे. त्यामुळे १४ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीमध्ये घट होण्यासाठी सर्वसामान्यांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com