mosquitoes increases in wathoa of nagpur
mosquitoes increases in wathoa of nagpur sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : डासांचा त्रास; दुर्गंधी सोबत रात्र

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पाचशे बेडची सोय असलेल्या सीपीआरमध्ये रोज ३०० वर रुग्ण ॲडमिट असतात. या रुग्णांच्या नातेवाइकांना सीपीआरमध्ये राहण्याची सोय नाही. सीपीआर प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव देऊनही नवीन शेड बांधलेले नाहीत. पावसाळ्यात रुग्णांच्या नातेवाइकांना गैरसोय होते. पालकमंत्र्यांची सूचना व अधिष्ठातांच्या प्रस्तावाला धुडकावून सार्वजनिक बांधकाम विभागाने कठोरपणाचा कळस केला आहे. या सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सीपीआरमध्ये कोल्हापूर शहर ग्रामीणसह सांगली, कोकणात व सीमा भागातून अनेक रुग्ण येतात. अार्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचा समावेश असतो. रुग्ण ॲडमिट झाला की, सोबत थांबण्यासाठी एक व्यक्ती गावाकडून डबा आणणे, औषधे आणणे किंवा रुग्णाला चाचण्यांसाठी बाहेर घेऊन जाणे अशा अनेक कामासाठी रुग्णाशेजारी आवारात एक ते दोन व्यक्ती थांबून असतात.

अशावेळी रुग्णांची गंभीर स्थिती झाल्यास जवळचे लोकही रुग्‍णाला पाहायला परगावावरून येतात. रुग्ण गंभीर असल्यास नातेवाईक निघून जाणे अशक्य होते.

रुग्णालयात तीन ठिकाणी शेड बांधली, मात्र त्याला भिंती नाहीत. शेडची झाडलोट रोज होते, पण पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाईल चार्जिंगची सोय नाही, अस्वच्छता असते, मोकाट कुत्र्यांचा वावर असतो. डासांचा उपद्रव वाढत आहे. अशा गलिच्छ वातावरणात थंडी, पावसात रात्र जागून काढण्याची वेळ येते. तीन शेड अपुरी पडतात. गैरसोयीबाबत आमदार व पालकमंत्र्यापर्यंत तक्रारी झाल्या. पालकमंत्र्यांनी तातडीने शेडची सुविधा सक्षम करा, अशा सूचना देऊन तीन महिने झाले, मात्र पुढे कार्यवाही झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT