kolhapur municipal corporation  election political update
kolhapur municipal corporation election political update 
कोल्हापूर

राजकारणातून सामान्य कार्यकर्ता गायब; मनी, मसल पॉवर असणाऱ्यांचा पक्षांकडून शोध

डॅनियल काळे

कोल्हापूर :  महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकेकाळी महापालिकेत अपक्ष नगरसेवकांचे राज्य होते. ते आता संपले आहे. 


राजकीय पक्षांनी महापालिकेचे सत्ताकारण हाती घेतले आहे. राजकीय पक्षांना इलेक्‍टिव्ह मेरीट असणारे उमेदवार हवे आहेत. त्यासाठी पक्षाचा शोध सुरू आहे. मनी, मत्सल पॉवरसह इलेक्‍टिव्ह मेरीट असणारा उमेदवार पक्षांना हवा आहे. अशा उमेदवारासाठी नेते फिल्डिंग लावत आहे. सामान्य कार्यकर्त्यांला महापालिकेत संधी, हे काळाच्या ओघात नाहीसे झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीतून आणि राजकारणातूनही सामान्य कार्यकर्ता गायब झाला आहे.


दहा वर्षापासून महापालिकेत राजकीय पक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय पक्षांना बहुमताची जुळणी करण्यासाठी इलेक्‍टिव्ह मेरीट असणारा उमेदवार हवा आहे. निवडणूक लढविणे आणि जिंकणे हे एैऱ्यागैऱ्याचे काम राहिलेले नाही. सामान्य कार्यकर्ता तर इच्छा असूनही ही निवडणुकीत उतरू शकत नाही. मनी आणि मत्सल पॉवर ही निवडणुकीतील मोठी ताकद झाली आहे. यापूर्वी पाच ते दहा हजारात महापालिकेची निवडणूक व्हायची. सकाळी आणि सायंकाळी कार्यकर्त्यांची प्रचार फेरी झाली की, चिरमुरे आणि फुटाण्यांवर कार्यकर्त्यांचे समाधान होत असे. काळ बदलत जाईल, तसे या निवडणुकांनाही व्यावसायिक स्वरुप आले.  
जेवणावळी हा तर निवडणुकीच्या काळातील नित्याचाच भाग झाला आहे. अलीकडे तरुण मंडळाप्रमाणेच महिला मंडळाच्याही पंगती उठवाव्या लागतात. परिणामी एका प्रभागात एका उमेदवाराचा निवडणूक खर्च हा काही लाखाच्या घरात आहे. काही उमेदवार कोटींपर्यंतचा खर्च करतात.

प्रचारप्रमुख पदावरच समाधान
महापालिकेचे राजकारण सामान्य कार्यकर्त्याच्या हातातून कधीच गेले आहे. सामान्य कार्यकर्त्यांनही पाच वर्षे कितीही सामाजिक काम केले. प्रत्येक कुटुंबातील सुखदु:खाच्या कार्यक्रमात तो कितीही सहभागी झाला. अनेकांची विविध प्रकारची कितीही कामे केली तरी शेवटी निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरायचे तर पहिला प्रश्‍न असतो, बजेट किती? त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या हातातून महापालिकेची निवडणूक कधीच गेली आहे. कार्यकर्त्याना केवळ प्रचारक म्हणूनच वापरले जात आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT