kolhapur Municipal Corporation fine to without mask
kolhapur Municipal Corporation fine to without mask 
कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेचा विनामास्क फिरणाऱ्यांना दणका  

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून 196 लोकांकडून 31 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल मंगळवार दि.3 मार्च 2021 रोजी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क 181 लोकांनकडून 18100, सोशल डिस्टन्स 12 लोकांनकडून 7500, सार्वजनीक ठिकाणी थुंकलेबाबत 2 लोकांनकडून 400 व प्लॅस्टिकचा वापर केलेमुळे 1 व्यक्तिंकडून 5000 असे एकुन 196 लोकांकडून 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

केवळ दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. शहरामध्ये गर्दी वाढत असलेने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्‍यक आहे. सन, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन करुन आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT