Kolhapur Municipal Corporation sakal media
कोल्हापूर

कोल्हापूर : महापालिकेत आज महापुराबाबत बैठक

कृती समितीचे सहभागाचे अावाहन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापुराची झळ बसलेल्या कुटुंबांसमवेत उद्या (ता. ८) महापालिकेत बैठक होणार आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सर्वपक्षीय पूर नियंत्रण कृती समितीने केले आहे.

दोन वर्षांपूर्वी, २०१९ ला आणि गेल्या वर्षी शहरात आलेल्या महापुरामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्याचे कटू अनुभव अनेकांनी घेतले. ‘आम्हाला पूर नको,’ अशी भूमिका घेऊन महापालिका प्रशासनाला वारंवार भेटून उपाययोजनांबाबत विनंती केली, पण अजूनही अपेक्षित उपाययोजना झालेल्या नाहीत. गेल्या पंधरा दिवसांत दोनदा झालेल्या पावसामुळे शहर अनेक ठिकाणी तुंबले. झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले, तरीही महापालिका पुराला तोंड देण्यात सज्ज असल्याचे सांगत आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असून, सर्वांनी सहकुटुंब बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन माजी महापौर आर. के. पोवार, ॲड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

Farmers Gold Loan : खरिपाच्या भांडवलासाठी शेतकऱ्यांवर घरातील सोनं तारण ठेवण्याची वेळ; बँकांच्या कारभाराने भ्रमनिरास, कांद्यालाही मिळेना भाव!

SCROLL FOR NEXT