shahu maharaj special story in kolhapur
shahu maharaj special story in kolhapur sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वासाठी राज्य शासनाने  पाच कोटींचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. हा निधी या वर्षात घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरला जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.

यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही विशेष सहकार्य केल्याचे श्री. पाटील यांनी एका निवेदनात नमूद केले आहे. त्यात म्हटले आहे की, देशभरात सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या महान व्यक्तींमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. केवळ २८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये राजर्षी शाहू यांनी दूरदृष्टीने अनेक महत्त्वाचे व क्रांतिकारी निर्णय घेतले. समाजकारण आणि प्रशासन यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत केला. सामाजिक समतेच्या निर्णयांची अंमलबजावणीद्वारे विकासाचे नवे पर्व राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले.

त्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने २८ एप्रिल ते २२ मेपर्यंत ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व’अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आम्ही या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी राज्य शासनाकडून तत्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती. राज्य शासनाकडून पाच कोटींची तरतूद व्हावी, याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार या कार्यक्रमासाठी सहायक आयुक्त समाजकल्याण (कोल्हापूर) यांना पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची सूचना महासंचालक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे) यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT