Kolhapur Sachin Hair Cutting In Ashram School Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

सचिन निघाला केस सेटिंगला....

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन जवळ आला की कोल्हापुरातील एका तरुणाची पावले कुशिरे गावातील आश्रमशाळेत आपोआप पडतात. तो या शाळेतील दोनशे मुलांचे केस कटिंग अगदी मोफत करतो. वर्षातून दोन दिवस ही सेवा करण्याचे काम तो गेल्या चार वर्षापासून करत आहे. कोल्हापुरातील या तरूणाचे नाव आहे सचिन मेथे .
 आपण ही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने सचिन यांनी आश्रम शाळेत केश कर्तन रूपाने आपली सेवा शाळेत करण्याचा निर्धार केलाय. तो त्यांनी आज पर्यंत पळला आहे.

 अगदी न चुकता स्वातंत्र्यदिन प्रजासत्ताक दिन आठवड्याभर पुढे असतानाच ते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आश्रमशाळेतील मुलांची हेअर स्टाईलची सेवा करण्यासाठी आवर्जून येतात. कालच त्यांनी शाळेतील दोनशे मुला-मुलींची केस कटिंग केले.
 कोल्हापुरातील देवकर पाणंद याठिकाणी सचिन मेथे यांचे यस कुमार नावाचे जेंट्स पार्लर आहे. एक दिवस आपले दुकान बंद ठेवून मेथे हे आपल्या सहकार्याना घेऊन शाळेत येतात व शाळेतील मुलांना पाहिजे तशी त्यांच्या आवडीने केसांची हेअर स्टाईल करून देतात .अनोख्या हेअर स्टाईल मुळे मुले अगदी खुलून हरखुन जातात .

मुलांच्या केस कटिंगसाठी शिक्षक ही राबत आहेत

ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या कुशिरे गावातील माळावर ही आश्रमशाळा आहे. या शाळेत भटक्या विमुक्त जाती-जमातीतील विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेतील अनेक मुलांना आई-वडील नाहीत . अनेक मुलांची परिस्थिती गरिबीची आहे. मुलांच्या  शिक्षणाचा खर्च शाळेस करावा लागतो. 
एरवी, सर्व मुलांचे केस कटिंग शाळेतील शिक्षक वर्गणी काढून करतात. श्री मेथे हे एकदा आश्रमशाळेत आले होते. त्यांना शाळेतील मुले पाहून भरून आले. त्यांनी शाळेत आपल्या परिने काहीतरी करण्याचे ठरविले आणि राष्ट्रीय सणच्या निमित्तानं तरी या मूलांची सेवा करण्याचे भाग्य आपल्या हातून घडावे असे त्यांना वाटले आणि त्यांनी हा उपक्रम आजतागायत सुरू ठेवला आहे.

मेथे यांची ही सेवा समाजाला प्रेरणायी

श्री मेथे हे मूळचे पन्हाळा तालुक्यातील बोरीवडे या गावचे असून गेल्या पंचवीस वर्षापासून ते कोल्हापुरात राहतात. एकूणच श्री सचिन मेथे यांची ही सेवा समाजाला प्रेरणा देणारी आहे. आश्रमशाळेतील गरीब विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी मला गेल्या चार वर्षापासून मिळत आहे. हे मानसिक समाधान खरोखरच पैशात मोजता येत नाही. वर्षातून दोन वेळा म्हणजे पंधरा ऑगस्ट प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून ही सेवा मी पुढे चालवणार आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women World Cup : भारतीय महिला संघ सेमिफायनलमध्ये तर पोहोचला, पण सामना नेमका कधी अन् कुणाशी होणार? जाणून घ्या समीकरण...

एकदम क्यूट! शशांक केतकराच्या लेकीला पाहिलत? दिवाळीनिमित्त शेअर केला खास फॅमिली फोटो

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७व्या रोजगार मेळाव्यात ५१,०००हून अधिक युवकांना नियुक्तीपत्रे दिली

Piyush Pandey Death : 'अबकी बार, मोदी सरकार' या घोषवाक्याचे जनक पियुष पांडे यांचे निधन; कॅडबरी, फेविकॉल, एशियन पेंट्ससारख्या जाहिरातींना दिलं नवं रूप!

Jayant Patil : जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदललं, गोपीचंद पडळकरांच्या मतदार संघातील साखर कारखाना कमानीवर वेगळचं नाव...

SCROLL FOR NEXT