अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांनी झालेली गर्दी.
अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांनी झालेली गर्दी. Sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : पर्यटकांच्या गर्दीने अर्थकारणाला बळ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शालेय सुट्या संपत आल्या, पावसाला सुरुवात होत आहे, अशा स्थितीत सुटीचा, सहलीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गर्दीने शहर गजबजून गेले. अंबाबाई मंदिराबरोबर प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत पर्यटकांनी आनंद द्विगुणित केला. तीन-चार दिवसांच्या पर्यटनाचा आनंद घेऊन अनेकजण गावी परतत असताना कोल्हापुरात मुक्काम केला, तर काहीनी धावती भेट देत कोल्हापूर दर्शन केले व परतीचा मार्ग धरला.

पर्यटनासाठी कोल्हापूरमार्गे कोकण व गोव्याकडे जाण्याचे नियोजन करून अनेकजण बाहेर पडले. त्यानुसार महिन्याभरापासून अशा पर्यटकांची कोल्हापुरात गर्दी आहे. यात कौटुंबीक पर्यटक लक्षणीय संख्येने आले आहेत. मुंबई पुण्यासह सोलापूर, लातूर, औरंगाबाद, नांदेड, यवतमाळ भागातील अनेक पर्यटक तसेच गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक भागातील पर्यटकही मोठ्या संख्येने आले आहेत.

काहींनी गोव्यावरून परत जाताना कोल्हापूरात एक मुक्काम केला. त्यामुळे यात्री निवास, हॉटेलचे बुकिंग, फार्म हाऊस फुल्ल होते. रंकाळळा, न्यू पॅलेस, पन्हाळा, जोतिबा, कणेरी मठ, त्र्यंबोली टेकडी आदी प्रेक्षणीयस्थळावर पर्यटकांची गर्दी होती. दिवसभरात खाद्य पदार्थांचे स्टॉल्स चप्पल, गूळ, कोल्हापुरी चटणी-मसाल्याची खरेदी केली. त्यामुळे बाजार पेठेतही गर्दी होती, तर रात्री तांबडा पांढऱ्या रश्‍यासह मंसाहारी जेवनाचा अास्वादही घेतला. त्यामुळे बहुतांशी हॉटेल गर्दीने फुलून गेले.

एका व्यक्तीच्या जेवण-नाष्‍ट्याचा कोल्हापुरातील खर्च पाचशे रुपये धरला तरी दिवसाला एक लाख पर्यटक कोल्हापुरात येत होते. त्यातून जवळपास पन्नास लाखांची उलाढाल खाद्य क्षेत्रात रोजची झाली. जवळपास दहा हजारांवर रूम्सची सुविधा आहे. सरासरी सातशे रुपये रूमचे भाडे धरले तरी पंधरा वीस लाखांचा रोजचा व्यवसाय साधला गेल्याचा अंदाज आहे. थोड्याफार फरकाने असेच चित्र अन्य बाजारपेठेतही होते. त्यामुळे अर्थकारणाला बळ लाभले.

महिन्यात १९ लाखांवर भाविक

श्री अंबाबाई मंदिरात मे महिन्यात सर्वाधिक गर्दी राहिली. एक मे पासून ते आजअखेर १९ लाखांवर भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. दोन चोरीच्या घटना वगळता अनुचित प्रकार घडला नाही. महिन्याभरात सुमारे सत्तर लोकांच्या हरवलेल्या वस्तू परत दिल्या. गर्दीत हरवलेल्या सुमारे चाळीस ज्येष्ठ व लहान मुलांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून पालकांपर्यंत सुखरूप पोचविल्याची माहिती देवस्थान समितीने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT