Crime News
Crime News esakal
कोल्हापूर

विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरच्या युवकाला सदलग्यात भोसकले

सकाळ वृत्तसेवा

सदलगा : येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक पाहण्यास आलेल्या कोल्हापूर येथील युवकावर मंगळवारी (ता. २१) रात्री चाकू हल्ला झाला. त्यात विशाल शेवडे (वय २७) हा जखमी झाला. या घटनेमुळे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले.

याबाबत अधिक माहिती अशी,

सदलगा येथील ड्रॅगन बॉईज, जी. एस. युवक मंडळ, भगतसिंग युवक मंडळ, ब्लॅक पॅंथर युवक मंडळ, नवग्रह ग्रुप, शास्त्रीचौक युवक मंडळ, गोल्डन गणेश युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित व शांततेत मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टीने आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट करून बाप्पांच्या मिरवणुकीची तयारी केली होती. कोरोना काळात दोन वर्षापासून गणेश विसर्जन साधेपणाने केली होती. यंदा विसर्जन करण्यास मिळणार असल्याने युवकात उत्साहाचे वातावरण होते. रात्री 8 वाजल्यापासून मंडळानी आपापल्या ठिकाणाहून मिरवणुकीला प्रारंभ केला. मिरवणूक पाहण्यासाठी सद्लगा परिसरासह कर्नाटक, महाराष्ट्रातील गावातून युवक मोठ्या प्रमाणावर येत होते. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांची रस्त्यावर दुतर्फ़ा गर्दी झाली होती.

हजारोंच्या संख्येने युवक मिरवणुकीत नृत्य करत होते. शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक शांततेत चालू असताना रात्री दहाच्या सुमारास कल्पवृक्ष बॅंकेजवळ मिरवणूक पाहण्यास आलेल्या चार-पाच युवकांमध्ये वादावादी होऊन एकावर चाकू हल्ला झाला. विशाल शेवडे (वय 27, रा. कोल्हापूर) असे या हल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला रुग्णवाहिकेतून बेळगाव जिल्हा रूग्णाललयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे हलविले आहे. हल्यामागील नेमके कारण समजू शकले नाही. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

अचानक झालेल्या लाठीहल्यामुळे कार्यकर्ते व मिरवणूक पाहण्यास आलेल्या युवक, महिला व नागरिकांची धावपळ उडाली. मिरवणूक अर्ध्यावरच थांबविल्याने कार्यकर्त्यांत नाराजी दिसत होती. मंडल पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र आज्जन्नवर घटनेबाबत तपास करत आहेत. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही. पोलिसांकडून घटनेबाबत माहिती घेण्यात येत आहे. शांतताप्रिय सदलगा शहरात बाहेरगावच्या युवकांनी केलेली हुल्लडबाजी, भांडण व चाकू हल्ल्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर दिसत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT