leopard attack dog and goat kolhapur marathi news
leopard attack dog and goat kolhapur marathi news 
कोल्हापूर

 बिबट्याचा पुन्हा शेळ्या, कुत्र्यावर हल्ला ;  आठवड्यात  तिसरी घटना

शिवाजीराव चौगुले

शिराळा  (कोल्हापूर) : पुनवत पैकी शेळके वस्ती येथील बाबासो नामदेव भोळे व संभाजी नामदेव भोळे यांच्या  ७ शेळ्या व एका कुत्र्यावर तर वाकुर्डे खुर्द येथे दोन कोंबड्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले.पुनवत येथील ही घटना मंगळवारी रात्री घडली. घटनास्थळी वनक्षेत्रपाल सुशांत काळे,वनरक्षक प्रकाश पाटील ,मारुती पाटील ,ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील,पोलीस पाटील बाबासाहेब वरेकर यांनी भेट देऊन पंचनामा केला. डॉ.के.जी.माळी यांनी शवविच्छेदन केले. 

कणदूर व पुनवत परिसरात आठवड्यात ही तिसरी घटना घडल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
 दरम्यान आज सकाळी वाकुर्डे खुर्द (ता.शिराळा) येथील जाधव नगर  मध्ये सूर्यकांत तानाजी जाधव यांच्या समोर सकाळी साडे सात वाजता बिबट्याने पोल्ट्री बाहेर ठेवलेल्या गावठी कोंबड्यावर हल्ला करून  त्यांना ठार केले.


याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,

सूर्यकांत  तानाजी जाधव यांची जाधवनगर येथे पोल्ट्री आहे. ते नेहमी प्रमाणे आज सकाळी कोंबड्यांना खाद्य घालण्यासाठी गेले होते. त्यांनी पोल्ट्रीच्या बाहेरील बाजूस देशी कोंबड्या ठेवल्या आहेत. आता पोल्ट्रीतील कोंबड्यांना खाद्य घालत असताना बाहेर कोंबड्यांचा गोंगाट ऐकावयास आला. त्यानी बाहेर येऊन पहिले असता त्यांना बिबट्याने दोन कोंबड्या तोंडात धरल्याने दिसले. ते पाहून त्यांनी आरडाओरडा केला असता कोंबड्यांना तिथेच सोडून पळाला. मात्र त्यात दोन कोंबड्या मृत झाल्या आहेत.

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT