Lockdown tight; The pot is bold
Lockdown tight; The pot is bold 
कोल्हापूर

लॉकडाऊन कडक; मटका बेधडक 

सकाळ वृत्तसेवा

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : तोंडाला मास्क नसेल तर कारवाई, दुचाकीवर डबल सीट दिसला की कारवाई, एकत्र जमलात तरी संचारबंदीचे उल्लंघन. अशा काटेकोर वातावरणात राधानगरीत कोरोना पाळला जात असताना दुसरीकडे "नियम कडक आणि मटका बेधडक' अशी स्थितीही आहे. आज या परिसरातील मटका अड्डे खुलेआम सुरू झाल्याने नागरिकांतून आक्षेप घेतला जात आहे.

गेले दोन महिने जीवाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक गावाने नियम कडक पाळले. काही गावांनी शिवही ओलांडली नाहीत. शिवारात काम करताना उन्हात तळपताना महिलांनी तोंडाला मास्क लावले आणि सोशल डिस्टिंक्‍शन पाळला. दूध डेअरीत घालताना अंतराची सीमा पाळली. कायद्याचे काटेकोरपणे पालन केले. कोरोनाला पळवून लावण्यासाठी सारेच एक झाले.

आज सोमवारचा (ता. 11) मुहूर्त पाहूनच मटका अड्डे ओपन झाल्याचे दिसून आले. या अड्ड्यांमुळे मटका खेळणाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नसला तरी येथे होणारी गर्दी हे कोणत्या नियमात बसते आणि याला परवानगी दिली तरी कुणी हा प्रश्न गावागावात चर्चेत आला आहे. परिसरात बुकी चालवणारा "भोलेनाथ' मूळचा इचलकरंजीचा. मग कडक नियम पाळणाऱ्या गावाने त्याला प्रवेश कसा दिला. दुसरीकडे याबाबत पोलिसांना माहिती नाही हेही चित्र पुढे येत आहे मात्र याबाबत ही शंका-कुशंका आहेत. 

काही माहिती नाही 
राधानगरीचे पोलिस निरीक्षक उदय डुबल यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत काही माहिती नाही. असे असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करून संबंधितांच्या मुसक्‍या आवळू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT