जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे
जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे sakal
कोल्हापूर

आघाडीमुळेच आरक्षणाचा बट्ट्याबोळ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला होता. न्यायालयातही आरक्षण टिकले होते, मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच भोंगळ कारभार सुरू झाला आणि आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, अशा महाविकास आघाडाली धडा शिकवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलजवळ सभेत ते बोलत होते. उत्तर पोटनिवडणुकीत सत्यजित ऊर्फ नाना कदम यांच्या प्रचारार्थ समरजितसिंह घाटगे यांची सभा झाली.

घाटगे म्हणाले, ‘‘भाजप काळात आरक्षण मिळाले. न्यायालयातही ते टिकले. या आरक्षणाचा लाभही मराठा समाजाला झाला, मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच त्यांनी भोंगळ कारभार सुरू केला. त्यांच्या दुर्लक्षामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले. ओबीसी समाजालाही आरक्षणापासून वंचित राहावे लागते का, अशी भीती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला केवळ स्वतःच्या तुंबडया भरण्यात रस आहे. जनतेच्या प्रश्‍नांची आणि मराठा समाजाच्या आक्रोशाशी त्यांचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळेच कोल्हापूर उत्तरमधून भाजपचे उमेदवार नाना कदम यांना निवडून देऊ, परिवर्तनाची सुरुवात करूया.’’

व्यासपीठावर धनंजय महाडिक, सचिन तोडकर, सत्यजित ऊर्फ नाना कदम, माणिक पाटील-चुयेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते, तर नागरिकांनीही सभेला मोठी गर्दी

केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT