koolhapur
koolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur : ‘राजाराम’ची सभा महाडिकांची शेवटची

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याची शुक्रवारी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार महादेवराव महाडिक व त्यांच्या संचालकांची शेवटची सभा असेल. ही सभा व्यवस्थित पार पाडून परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहूया, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीत झालेल्या कारखाना सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते.

श्री. पाटील यांनी राजाराम कारखान्याचे १३४६ सभासद न्यायालयाने अपात्र ठरविले. हे सभासद अपात्र करण्यासाठी न्यायालयात झालेल्या त्रासाबाबत सभासदांना माहिती दिली. परिवर्तनाची पहिली लढाई आपण जिंकलो आहोत. त्यामुळे राजाराम कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी सभासदांनी सज्ज राहावे, असेही ते म्हणाले.

गेल्या पंचवीस वर्षांनंतर आता होणाऱ्या सभेसाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. भगवानराव पवार यांनी साखर कारखाना चालवण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाला. राजाराम साखर कारखान्याच्या सातबारावर अमल महाडिक याचे नाव लावायचे नसेल तर परिवर्तन घडवूया. विजय टप्प्यात आहे, त्यामुळे आजपासूनच प्रयत्न चालू ठेवा, असेही श्री. पाटील म्हणाले.

गेले पंचवीस वर्षे आमदार महादेवराव महाडिक यांच्याबरोबर कारखान्यात काम केले. मात्र, आम्हाला नावाला ठेवले. आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतले. भूलथापा लावून व्यापाऱ्याने भले करून घेतले, अशी टीका माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केली.

कार्यक्षेत्रालगतच्या गावातल्या सभासदांना कुठलाही सहकारमधला फायदा दिला नाही. हा कारखाना व्यापाऱ्याच्या हातातून काढून घेऊन शेतकऱ्यांच्या हक्काचा व्हावा. या लढ्यासाठी सतेज पाटील यांच्या पाठीशी राहू, असे मत बाजीराव पाटील यांनी व्यक्त केले.

आमदार ऋतुराज पाटील, श्रीराम सोसायटीचे अध्यक्ष हिंदूराव ठोंबरे, ‘गोकुळ’चे संचालक बाबासो चौगले, शशिकांत चुयेकर, एस. आर. पाटील, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, विजयसिंह मोरे, शरद साखरचे संचालक अभिजित भंडारी, उत्तम सावंत, धनराज घाटगे आदी उपस्थित होते.

बावड्यातून जाणे महाग होईल

शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत महाडिक गटाकडून गोंधळ घालण्याची व्यूहरचना सुरू आहे. सभेला आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. सभेमध्ये बाहेरील लोक आणून जर सामान्य सभासदांना त्रास दिलात, तर जशास तसे उत्तर देऊ. सभा झाल्यावर बावड्यातून बाहेर जाणे महाग होईल, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT