Murgud's cattle market closed again
Murgud's cattle market closed again  
कोल्हापूर

कोरोनाच्या धास्तीने मुरगूडचा जनावरांचा बाजार पुन्हा बंद

सकाळवृत्तसेवा

मुरगूड : राज्यातील सर्वात मोठा असणारा जनावरांचा आठवडा बाजार शासनाच्या पणन विभाच्या परवानगीने सुरू झाला होता; पण कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता तो पुन्हा बंद केल्याची माहिती मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 98 दिवस बाजार बंदच होता. पणन संचालनालयाकडील आदेशानुसार बाजार समित्यांनी जनावरांचा बाजार सुरू करण्यासाठी कळविले होते. त्यानुसार 30 जूनपासून सकाळी 6 ते दुपारी 2 या कालावधीत केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी बाजार सुरू करण्याचा निर्णय शहर समितीने घेतला होता. 

सध्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा समूह संसर्ग होवू नये यासाठी नगरपरिषद शहर समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच मंगळवारचा भाजीपाला बाजारदेखील बंद ठेवण्यात येणार असून बाहेरील भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांना येथे येण्यास प्रतिबंध केला आहे. स्थानिक विक्रेत्यांनी दररोज सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंतच भाजीपाला विक्री करण्यास मुभा आहे. किराणा व अन्य दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असून याचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे. सर्वांनी नियमाचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्ष धनाजीराव गोधडे, पक्षप्रतोद नामदेवराव मेंडके व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे. 
कोल्हापूरकोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT