new 17 corona positive cases in kolhapur district
new 17 corona positive cases in kolhapur district 
कोल्हापूर

Breaking-कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरूच ; १७ नव्या रूग्णांची भर 

शिवाजी यादव

कोल्हापूर - कोरोना रुग्णसंख्येत अद्याप वाढच होतच आहे. आज दिवसात १७ बाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा एक हजार १९८ झाला आहे. यातील दहा कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर आहे. काल दिवसभरात २५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यांची संख्या आता ८३५ झाली आहे. 

आता पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये कोल्हापूर शहर चार, इचलकरंजी तीन,  गडहिंग्लज तीन, चंदगड दोन,  हातकणंगले एक, शाहूवाडी एक, करवीरमधील तीघांचा समावेश आहे.  


इचलकरंजीतील रुग्णसंख्या १०७
 शहरात काल कोरोना रुग्णांच्या संख्येने शतक पार केले. दिवसभरात नऊ नवीन रुग्ण आढळले. यात विक्रमनगरमधील माजी उपनगराध्यक्षांसह सोडगे मळ्यातील नवीन तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. गणेशनगरमधील एकाच कुटुंबातील चौघे बाधित झाले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या १०७ वर पोचली. आतापर्यंत शहरातील एका तरुणासह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. 


शहरात १५ दिवसांत कोरोनाने कहरच केला आहे. रोज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कुडचे मळा येथे सामूहिक संसर्गाला सुरवात झाल्यावर आता शहरातील विविध भागांत रुग्ण आढळून येत आहेत. शहरात ३० पेक्षा अधिक प्रतिबंधित क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. घरोघरी पाहणी करून संशयास्पद व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. औषध फवारणीद्वारे निर्जंतुकीकरणही सुरू आहे. त्याचवेळी संसर्ग टाळण्यासाठी १४ जुलैपर्यंत शहर १०० टक्के लॉकडाउन आहे.
दरम्यान, सोडगे मळ्यात आज तीन रुग्ण आढळले. यापूर्वीच येथे दोन रुग्ण होते. त्यांच्या संपर्कातील तिघांना संसर्ग झाला.

विक्रमनगरमधील एक माजी उपनगराध्यक्ष बाधित झाले आहेत. दत्त कॉलनीतील एक महिला पॉझिटिव्ह आहे. गणेशनगरमधील एकाच कुटुंबातील चौघांना संसर्ग आहे. यापूर्वी या कुटुंबातील एकजण बाधित होता. रुग्णांची संख्या १०७ वर पोचली आहे. 
सनियंत्रण बैठकीतील आणखी एक बाधित
शहर सनियंत्रण समितीच्या बैठकीला उपस्थित असलेल्या एका माजी नगरसेवकास संसर्ग झाला होता. त्यामुळे सर्व उपस्थितांना १४ दिवस होम क्वारंटाईन केले होते. यातील तीन पोलिस अधिकाऱ्यांसह एका कर्मचाऱ्याचा स्वॅब निगेटिव्ह आला असतानाच एका माजी उपनगराध्यक्षाला कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे ही बैठक पुन्हा चर्चेत आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT