gahat.jpg 
कोल्हापूर

राधानगरी अभयारण्यात ओपनबार, धरणाच्या काठावर कचरा

राजू पाटील, राशिडे बुद्रुक

राशिवडे बुद्रुक, कोल्हापूर  : राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील अनेक ठिकाणी 'ओपन बार' पुन्हा सुरू झाले आहेत. राधानगरी धरणाच्या काठावरचे पिकनिक स्पॉट यामुळे कचऱ्याने भरू लागले आहेत. यावर वन्यजीव आणि प्रशासनाकडून अंकुश ठेवण्याची गरज भासू लागली आहे. 
राधानगरीपासूनच तलावाच्या सभोवती अनेक ठिकाणी पर्यटकांची रेलचेल असते. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी तलाव काठचा परिसर विलोभनीय आहे. फेजीवडे - हसणेकडून दाजीपूर किंवा राऊतवाडी- कारिवडे मार्गे दाजीपूर. हे दोन्ही रस्ते चांगले असल्याने पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. मात्र निसर्गप्रेमी बरोबरच हौसे आणि हुल्लडबाज पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. अनेक ठिकाणचे स्पॉट प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यामुळे अस्वच्छ वाटू लागले आहेत. 
सहा वर्षापूर्वी "सकाळ'ने निसर्गप्रेमींच्या सहकार्याने हाती घेतलेल्या अभयारण्य स्वच्छता मोहीमे नंतर इथे एक वेगळी शिस्त निर्माण झाली होती. परंतु गेल्या सहा महिन्यापासून बेशिस्तीचे वातावरण दिसू लागले आहे. वन विभागाकडे नवे अधिकारी किंवा नवीन कर्मचारी बदलून येतात. तेंव्हा त्यांनाच याबाबत जागृत करावे लागते. 
फेजिवडेपासून दोन किलोमीटरवर असलेला माळ आणि राऊतवाडी धबधब्याच्या अलीकडील माळ हे रोज संध्याकाळचे ओपन बार बनू लागले आहेत. येथे कचरा विखरून पडला आहे. पुढे तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील हसणेपासून फोंडा घाटाच्या खिंडी पर्यंत असे प्रकार ठिकठिकाणी दिसून येतात. 
पैसे मिळवण्याच्या नादात विकास समित्या व जंगल सफारीवाल्यांनाही याची जाणीव नाही. त्यामुळे हा परिसर आता बदनाम होऊ लागला आहे. ओपन बार आणि बेशिस्त पर्यटकांवर वन्यजीव विभागाने जरब बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

वन्यविभागाने गांभीर्याने पहावे 
सहा वर्षापूर्वी 'सकाळ' परिवाराने निसर्गप्रेमींच्या मदतीतून अभयारण्य स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी साठ टन प्लास्टिक आणि बाटल्या जमा झाल्या होत्या. दुसऱ्या वर्षी पुन्हा ही मोहीम घेतली. तेव्हा दहा टन कचरा संकलित झाला. आता सातत्याने मोहिम घेण्याऐवजी वन्यजीव विभागाने जबाबदारी म्हणून याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. 


तलावाच्या काठावरील अनेक स्पॉट हे खासगी मालकीचे किंवा जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येतात. अशा ठिकाणी पर्यटक असल्यास त्यांच्यावर कारवाई करणे कठीण जाते. तरीही गस्तीच्या वेळी आम्हाला निदर्शनास आल्यास त्यांना हटकतो, प्रसंगी कारवाई ही करतो. पर्यटकांनी स्वतःहून शिस्त पाळणे गरजेचे आहे. स्वच्छतेबाबत फलकही लावले आहेत. 
- अनिल जेरे, सहाय्यक वनसंरक्षक राधानगरी 


संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : माझ्या मुलीसारखी, पण चुकी झाली! एकटीला पाहून भररस्त्यात छेड काढली, तरुणीनं धडा शिकवताच धरले पाय

Pune Metro : 'कारशेड'साठी जागाच नाही! पुणे मेट्रोच्या चौथ्या टप्प्यात मोठा अडथळा; CWPRS ने प्रस्ताव फेटाळला

Jayant Patil vs Gopichand Padalkar : ‘...राव तेवढा ढापलेला कारखाना परत द्या’ भर चौकात लावला पोस्टर, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद टोकाला

काठीला कापड गुंडाळल्यासारखी दिसते... बारीक असल्याने 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला हिणवलं; अनुभव सांगत म्हणाली-

Pune Redevelopment : लोकमान्यनगरचा पुनर्विकास राजकीय आणि 'म्हाडा'च्या हस्तक्षेपामुळे थांबला! नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT