Out of Mahadik, Chikode, Jadhav, who has the formula in the municipal elections? 
कोल्हापूर

महाडिक, चिकोडे, जाधव यांच्यापैकी  महापालिकेच्या निवडणुकीत सूत्रे कोणाकडे 

डॅनियल काळे

कोल्हापूर  : महापालिकेच्या निवडणुकीत विरोधी बाकावर असलेली भारतीय जनता पार्टी यंदाच्या महापालिका निवडणुकीत कितपत यशस्वी होते, हा प्रश्‍न आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे नेतृत्व कोण करणार, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. या निवडणुका प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली होणार की जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणार, हा प्रश्‍न निरुत्तरित आहे. 
महापालिका निवडणुकीची सर्व धुरा महाडिकांकडे दिली तर पक्षाला त्याचा फायदा होईल, असा एक मतप्रवाह पक्षात आहे, तर पक्ष संघटनेनेच निवडणुकीचे नेतृत्व करावे, असा जुन्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. महाडिकांकडे सूत्रे दिली ताराराणीनेही भाजपत विलीन झाले पाहिजे, असा एक आग्रह आहे, पण ताराराणी आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे लागणार आहे. कारण जेथे भाजपची वोटबॅंक नाही. तेथे ताराराणी आघाडीच्या झेंड्याखाली उमेदवार निवडून आणण्याची आघाडीची रणनीती आहे. अशा जुन्या नव्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळ घालणे हेच खरे भाजपसमोर आव्हान आहे. हा मेळ घालायचा कोणी? त्यासाठी आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच खास वेळ काढावा लागणार आहे. 

राज्यात 2014 ते 2019 या काळात भाजपची सत्ता होती. सत्तेचा उपयोग करत पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना मानाची पदे मिळाली. साहजिकच पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न झाला. या काळात कार्यकर्त्यांची पक्षात रीग लागली, पण या कार्यकत्यांचा पक्षाला कितपत उपयोग झाला किंवा पक्षाने त्यांचा उपयोग करून घेतला का? हाच महत्त्वाचा प्रश्‍न उपस्थित होतो. लोकसभेच्या पराभवानंतर धनंजय महाडिक यांनी भाजपत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर महापालिका निवडणुकीत भाजप सक्षमपणे पुढे जाईल, असा एक मतप्रवाह आहे, पण ताराराणी आघाडी विसर्जित करून पूर्णपणे भाजप म्हणून निवडणुका लढवायला ताराराणी आघाडीच्या अनेकांचा विरोध आहे. 
भाजपबरोबर ताराराणी आघाडीची युती करूनच निवडणुका लढण्याकडे ताराराणीचा कल आहे. त्यामुळे मूळ भाजपचे कार्यकर्ते किती ताकद लावतील आणि त्यांना किती यश येईल. हा प्रश्‍नही आहे. 2010 च्या निवडणुकीत महापालिकेत भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले होते. 2015 मध्ये पक्षाची सत्ता असताना आणि ताराराणी आघाडीबरोबर युती असतानाचा फायदा उठवत या पक्षाने 3 चे 13 नगरसेवक निवडून आले. विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसलेल्या भाजपला विरोधी पक्ष म्हणून प्रभाव टाकता आला नाही. याउलट सभागृहात महाडिक विरुध्द सतेज पाटील गट यांच्यातच संघर्ष पाहायला मिळाला. 


अमल महाडिक यांचीही प्रतिष्ठा 
भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांना मानणारा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात एक गट आहे. महापालिका निवडणुकीत त्यांचाही प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. ते या निवडणुकीत किती सक्रिय राहतात. कोणत्या प्रभागांवर ते लक्ष केंद्रित करतात, हा महत्त्वाचा विषय आहे आणि भाजपसाठी त्यांची प्रतिष्ठाही महत्त्वाची आहे. 

* भाजपचे नगरसेवक -13 
* विरोधी पक्ष म्हणून विरोधी आघाडीच्या चौघांना संधी : संभाजी जाधव, किरण शिराळे, विलास वास्कर, विजय सूर्यवंशी. 
* एका वर्षासाठी स्थायी सभापतीपद भाजपचे अशिष ढवळे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT