कोल्हापूर

पेट्रोल डिझेल शंभर पार,मोदी बस करा जनतेची लुटमार; हळदीत करवीर काँग्रेस आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

हळदी (कोल्हापूर): पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या(Petrol, diesel and LPG gas) दरवाढी विरोधात करवीर काँग्रेसच्या वतीने हळदी (karveer congress at haldi)(ता. करवीर) येथील निवृत्ती संघाच्या पेट्रोल पंपावर आंदोलन झाले. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा आमदार पी.एन.पाटील(MLA PN Patil)यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार विरुद्ध निदर्शने करण्यात आली.(petrol-diesel-increase-protests-by-karveer-congress-at-haldi-kolhapur-marathi-news)

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील म्हणाले,कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व एलपीजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. या सरकारचा जितका निषेध करावा तितका कमी आहे.

यावेळी भोगावती कारखाना संचालक विश्वनाथ पाटील, धीरज डोंगळे, रवींद्र पाटील यांच्यासह बी.ए.पाटील,प्रा. सुनील खराडे, शिवाजी कारंडे, दिगंबर मेडसिंगे, शिवाजी तळेकर, कृष्णात धोत्रे, शंकर पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी केले तर आभार विष्णू पाटील यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT