Pits On Ajara-Amboli Road Kolhapur Marathi News
Pits On Ajara-Amboli Road Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजरा-आंबोली मार्गावर खड्डे चुकविताना नाकीनऊ

रणजित कालेकर

आजरा : नियोजित संकेश्‍वर बांदा मार्गाचा भाग असलेला आजरा-आंबोली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवून वाहन चालविताना चालकांच्या नाकीनऊ शब्दशः नाकीनऊ येतात. नुकताच या मार्गाचे रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती कुणी करावयाची, हा प्रश्‍नच अनुत्तरीत आहे. 

कोकणात उतरणारा जवळचा मार्ग म्हणून आजरा-आंबोली मार्गाकडे पाहिले जाते. या मार्गावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. यामुळेच संकेश्‍वर ते बांदा या मार्गाचा विकास करण्याचे नियोजन केंद्र शासनाने हाती घेतले आहे. यातूनच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणार हा रस्ता रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित केल्याचे सांगण्यात येते. यंदा कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला खीळ बसली आहे. त्यामुळे गेली सहा महिने हा रस्ता सुना-सुना होता, तरीही या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे.

कोरोनाचे कारण देत रस्ता दुरुस्तीसाठी विलंब होत आहे. लॉकडाउन उठल्यानंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू झाली आहे. त्यातच परतीच्या पावसानेदेखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने या रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. किरकोळ स्वरूपाचे अपघात रोज होत आहेत. त्याचबरोबर खड्ड्यात वाहन गेल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून, या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.

रस्ते विकास मंडळाकडून नियोजित मार्गाची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. या वेळी रस्त्याची दुरवस्था अधिकाऱ्यांना दाखविण्यात आली. दरम्यान, प्रशासनाने मुरुम टाकुन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या समस्येवर कायम स्वरुपी उपाय काढण्याची मागणी वाहन चालकांतून होत आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolha[ur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : पवईत ४ कोटी ७० लाखांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT