सोयाबीन
सोयाबीन 
कोल्हापूर

सोयाबीनचा दर ८५ वरून ५० रूपयांवर

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : शहर आणि ग्रामीण परिसरातील सोयाबीन पिकाला विक्रमी दर मिळत असलेल्या शेतकऱ्यांना एका रात्रीत व्यापारीवर्गाने झटका दिला. प्रतिकिलो ८५ रूपयांपर्यत असणारा दर ५० रूपये किलोवर आल्याने शेतकरीवर्गाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत असून निराशाही पसरली आहे.

एका रात्रीत तब्बल २८ ते ३० रूपये दर कमी झाल्याने शेतकरीवर्गाने सोयाबीन न विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची ही मोठी फसवणूक असल्याची चर्चा परिसरात होत आहे. निपाणी परिसरातील नगदी पीक म्हणजे तंबाखू आहे. पण बेभरवशाचे आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून होत असलेला बंदीचा फटका लक्षात घेवून त्याकडे दुर्लक्ष करीत या भागातील शेतकरी सोयाबीनकडे वळला आहे. या वर्षी सुरूवातीपासून चांगला दर मिळत असल्याने आनंद झाला. मात्र अचानक ५० रूपयांवर दर निघाल्याचे व्यापारीवर्गाने सांगितल्याने तोटा झाला आहे. सध्या ५० ते ५५ रूपयांवर दर आल्याने शेतकरीवर्ग हबकला आहे. व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना लुटण्याचा हा प्रकार असल्याची शेतकरीवर्गात चर्चा आहे. व्यापारी वर्गाची ही एक चाल असून सोयाबीन विकू नये, वाळवून ठेवावे असे आवाहन केले जात आहे.

१६ सप्टेंबरच्या दरम्यान सोयाबीनचा ८३०० ते ८८०० रुपये प्रतिटन असणारा दर २१ सप्टेंबर २०२१ ला ६३०० ते ६७०० रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवाहवासा असणारा सोयाबीनचा दर हवेतच विरून गेल्याचे चित्र निपाणी परिसरात पाहावयास मिळत आहे. शिवाय शेतकऱ्याच्या सर्व आशा-अपेक्षांवर पाणी फिरले आहे. नेहमी हवा आणि दर स्वतःच्या मर्जीप्रमाणे ठरवणारे व्यापारी हवेत असल्याचे आणि शेतकरी खाली कोसळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT