Saraf Sangh will donate 51 kg silver Ambabai Statue
Saraf Sangh will donate 51 kg silver Ambabai Statue sakal
कोल्हापूर

सराफ संघ देणार अंबाबाईची ५१ किलो चांदीची मूर्ती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईची ५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे १ मार्चला सुपूर्द केली जाणार आहे. त्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘सराफ संघाकडे ३१ वर्षांपासून करवीर निवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती आहे. अंबाबाई मंदिरात असणाऱ्या मूळ मूर्तीचीही अभिषेकामुळे झीज होत आहे. याच कारणासाठी आम्ही ही मूर्ती देण्याचा सर्व संमतीने निर्णय घेतला. त्यासाठी रितसर जिल्हाधिकारी कार्यालय व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून परवानगी घेऊन मूर्ती प्रदान करत आहोत. यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे यांचे सहकार्य मिळाले.या वेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार, संजय जैन, संचालक सुहास जाधव, सुरेश गायकवाड, सुरेंद्र पुरवंत, अमोल ढणाल, सुरेश राठोड उपस्थित होते.

गरुड मंडपात मूर्ती ठेवणार

मूर्ती देवस्थान समितीकडे सुपूर्द केल्यानंतर गरुड मंडपात मूर्ती ठेवण्यात येईल. तिचा वापर दैनंदिन पूजा आणि अभिषेकसाठी केला जाणार आहे. ४ मार्चला मंदिरात मूर्तीला अभिषेक केला जाणार आहे. त्याचबरोबर महायज्ञाचेही आयोजन केले आहे. यात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित सहकुटुंबे सहभागी होणार आहेत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT