saundatti renuka yallama festival stopped kolhapur aalate
saundatti renuka yallama festival stopped kolhapur aalate 
कोल्हापूर

सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा रद्द पण आंबील यात्रेचे काय?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेस कोल्हापूरकर यंदा मुकणार आहेत. यामुळे डोंगरावरील लाखोंची उलाढाल ठप्प होणार आहे. शिवाय एस.टी.महामंडळ उत्पन्नाला मुकणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने यात्रा रद्दचा निर्णय घेतला आहे. २९ डिसेंबरला यात्रेचा मुख्य दिवस होता.


शहरात प्रामुख्याने पेठांत घरोघरी रेणुकाचे देवस्थान आहे. दरवर्षी मानाची परडी डोंगराला नेणे आणि तेथून नवी खरेदी करणे ही परंपरा आहे. त्या त्या भागातील लोक यात्रेच्या निमित्ताने एकत्रित यावे आणि कौंटुंबीक जिव्हाळा साधावा यासाठी डोंगराला जाण्याची परंपरा आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच यात्रा रद्द झाली. पूर्वी २००५ ला बेळगाव येथे मराठी महापौरांना काळे फासल्यानंतर कन्नडिगांच्या निषेधार्थ कोल्हापूरवासीयांनी सौंदत्ती यात्रेवर बहिष्कार टाकून आळते (ता. हातकणंगले) येथे यात्रा भरविली होती. तत्पूर्वी १९८७ च्या सुमारास कर्नाटक प्रवाशी कराच्या निषेधार्थ यात्रेला न जाण्याचा निर्णय घेतला होता.


डोंगरावर तीन दिवसांत मोठी उलाढाल होते. दर्शन रांग वगळता अन्य रांगेने जायचे असेल तर तिकीट काढावे लागते. त्याचा फायदा मंदिर व्यवस्थापनाला मिळतो. कोल्हापूरसह कर्नाटकच्या विविध भागातून भाविक यात्रेसाठी दाखल होतात. यरगट्टीपासून पुढे पाण्याला नारळ वाहिल्यानंतर कुंडात लिंब नेसणे व अन्य धार्मिक विधी होतात. यात्रेच्या मुख्य दिवशी देवीला नैवैद्य वाहिला जातो. 


यात्रा रद्दचा फटका एस.टी.लाही बसणार आहे. शंभर ते सव्वाशे गाड्यांची नोंदणी प्रासंगिक करारावर होते. एका गाडीसाठी मालकाला १५ हजार द्यावे लागतात. भाविकांकडून पैसे एकत्रित केले जातात. तेथे राहण्याची तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था गाडीमालकांकडून होते. एस.टी.चा खोळंबा आकार नाममात्र होता.

कोरोनामुळे यात्रा रद्द होण्याची पहिलीच वेळ असावी. सौंदत्ती येथील यात्रेचे अर्थकारण कोल्हापूरकरांवर अवलंबून आहे. पूजेचे साहित्य, भंडारा, नारळ, साडी खण, ओटी, कुंकू विक्री यातून होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. पूर्वी २००५ ला मराठी महापौरांना काळे फासल्याने यात्रेवर बहिष्कार टाकला होता. नंतर यावर्षी यात्रा रद्द होत आहे.
- अच्युत साळोखे, संचालक, रेणुका भक्त संघटना

आंबील यात्रेचे काय?
सौंदत्ती यात्रेनंतर ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील यात्रा होते. यात्रेतही मोठी गर्दी होते त्यामुळे आंबील यात्रेबाबत कोणता निर्णय होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT