The search for positive doctors in Khutalwadi continues
The search for positive doctors in Khutalwadi continues 
कोल्हापूर

खुटाळवाडीतील डॉक्‍टर पॉझिटिव्ह, संपर्कातील लोकांचा शोध सुरू 

दिग्वीजय कुंभार

आंबा : खुटाळवाडी येथील 47 वर्षीय डॉक्‍टर आज कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून हे बाधित स्थानिक रुग्ण आहेत. दरम्यान, सायंकाळी पिशवी येथील 34 वर्षीय तरुण व पुसाळे येथील 29 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळली.

दोघेही मुंबईहून आले असून ते क्वारंटाईन होते. या अगोदर मुंबई, पुणे व अन्य बाधित क्षेत्रांतून आलेल्या नागरिकांनाच बाधा झाली होती. संबंधित डॉक्‍टर बाधीत क्षेत्रांतून आलेले नाहीत. त्यामुळे ते नेमके कोणाच्या संपर्कात आले व त्यांचा कोणाकोणाशी संपर्क झाला याची माहिती तालुका आरोग्य प्रशासन घेत आहे. 

संबंधित डॉक्‍टर खुटाळवाडी येथे व्यवसाय करतात. जवळपास 70 टक्के रुग्ण त्यांच्याकडे उपचार घेतात. शिवाय ते बांबवडे येथील हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला होता. बांबवडे येथील खासगी प्रयोगशाळेत स्वॅब घेतला होता. कोल्हापुरातील प्रयोगशाळेतून आज दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

तालुका आरोग्य प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत पेरीड येथील कोविड केअर सेंटरवर त्यांचा पुन्हा स्वॅब घेतला. जास्त त्रास होऊ लागल्यामुळे पुढील उपचारासाठी डॉ. डी. वाय. पाटील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले. दरम्यान, संबंधित डॉक्‍टरचा ज्यांच्याशी संपर्क झाला आहे त्यांनी तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी केले आहे. 

आजअखेर 191 बाधीत... 
तालुक्‍यात आजअखेर 191 बाधीत झाले आहेत. यापैकी 180 कोरोनामुक्त झाले आहेत. 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

दृष्टिक्षेप 
- बाधित आढळलेला स्थानिक रूग्ण 
- पिशवी येथील तरूण व महिला पॉझिटिव्ह 
- बांबवडे येथील खासगी प्रयोगशाळेत स्वॅब घेतला होता. 
- डॉक्‍टरशी संपर्क आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन 

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT