Senior Womens National Wrestling Championship Nandini Salokhe gold medal and Swati Shinde bronze medal sport news kolhapur
Senior Womens National Wrestling Championship Nandini Salokhe gold medal and Swati Shinde bronze medal sport news kolhapur 
कोल्हापूर

महाराष्ट्राचा सुवर्णपदकांचा दुष्काळ संपला ; "राष्ट्रीय कुस्ती'त कोल्हापूरच्या नंदिनीला सुवर्ण 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  : दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय 23 वर्षाखालील स्पर्धेत हरीयाणाच्या अंकुशविरुद्ध खेळताना नंदीनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला एक वर्षापासून जास्त काळ कुस्तीपासून दूर रहावे लागले होते. अर्थातच याचे दडपण नंदीनीवर होते. अखेरचे काही सेकंद शिल्लक असताना ती मागे होती, पण दोन वर्षापूर्वीचा वचपा काढण्याची आपल्याला संधी आहे, हे मार्गदर्शक लवटे यांचे शब्द तिला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरक ठरले.

 तिने लढतीचा निकाल फिरवण्यात यश मिळवत.अखेर वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत  नंदीनीने सुवर्ण पदक तर स्वाती शिंदे हिने कास्य पदक मिळवित  कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा  रोवला. नंदीनीच्या यशामुळे महाराष्ट्राचा सुवर्णपदकांचा दुष्काळ संपवला. मुरगुड कुस्ती संकुलात या दोघींना गेल्या सात वर्षांपासून दादा लवटे यांचे मार्गदर्शन सुरू आहे. 


आग्रा येथील स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शनिवारी स्वाती शिंदेने 50 किलो वजनी गटात कास्य पदक जिंकले होते. तर आज रविवारी नंदीनी साळोखे हिने 53 किलो गटात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. या गटातून ऑलिंपिक पात्रता मिळवलेल्या विनेश फोगटच्या अनुपस्थितीत स्पर्धा झाली आणि त्यात सर्व कुस्ती तज्ज्ञांना धक्का देत नंदीनीने बाजी मारली. मणिपूर, आंध्रप्रदेश व हरियाणा अंकुश कुमारीला पराभूत करून नंदिनीने अंतिम फेरीत धडक मारली होती. तिने अंतिम फेरीत दिल्लीच्या ममता राणीचा 8-0 असा सहज पराभव करीत आपली हुकुमत दाखवून दिली.

नंदीनीच्या यशाने तर अनेक वर्ष हुलकावणी देत असलेले सुवर्णपदक जिंकता गेल्या वर्षापर्यंत आपल्या कुस्तीगीर पदकापासून दूर रहात होत्या आता ते खंडीत झाले याचे समाधान आहे, आले असे दादा लवटे यांनी सांगितले. मुंबईतील डार्फ केटल ग्रुपने या दोघींना दत्तक घेतले आहे. कंपनीने या दोघांसाठी व्यायामशाळाही उभी केली आहे. या कंपनीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी विजय पाटील, स्वाती शिंदे व नंदिनी साळुंखेला 60 हजारांची विशेष मदतीनिधी दिला होता. 

खूप छान वाटत. पदकाची आशा होती, पण पदक लागेल की नाही ही धुकधुक होती, पण अखेर पदक लागल. फायनलच्यावेळी थोड टेन्शन होते. सुरुवातीस आघाडी घेतली आणि मग तिला चीतपटच केले. 
- नंदीनी साळोखे  

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT