Shahapur Mine In Ichalkaranji Polluted Kolhapur Marathi News
Shahapur Mine In Ichalkaranji Polluted Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीतील शहापूर खण केंदाळाने व्यापली

ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : शहापूरमधील छोट्या-मोठ्या खणींना केंदाळाने व्यापले आहे. खणीतील केंदाळाची सद्यस्थिती खेळाच्या मोकळ्या मैदानासारखी हिरवीगार दिसत आहे. परिणामी मानवी आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. खणींचे नेटके संगोपन करणे गरजेचे बनले आहे. दूषित पाणी आणि केंदाळामुळे शहापूर खणीचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. यासाठी नगरपालिकेकडून प्रभावी उपाययोजनांची आवश्‍यकता आहे. 

सुशोभीकरणानंतर गणपती विसर्जन सुरू करून शहापूर खणींचे महत्त्व नगरपालिकेने अधोरेखित केले. त्यानंतर संगोपनात खंड पडल्याने खणींचे चित्र विद्रूप बनले आहे. खणींची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कित्येक वर्षांपासून साचलेल्या गाळामुळे पाणी दूषित झाले आहे. पाण वनस्पती, जलपर्णी, तसेच केंदाळाचे साम्राज्य वाढले आहे. नव्या बदलत्या काळात नगरपालिकेने खणींच्या विकासाला चालना दिली; मात्र हा विकास खुंटला असून खणींची अवस्था बिकट आहे. 

शहापूर खणीलगत मोठी मानवी वस्ती आहे. दूषित पाणी व केंदाळाच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खणीतील वाढत्या केंदाळाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या खणी पूर्णपणे केंदाळाने व्यापलेल्या दिसून येतात. पाण्याचे दर्शन तर दिसेनासे झाले असून सर्वदूर केंदाळ पसरले आहे. खणीचा परिसर दुर्गंधीने प्रदूषित झाला असून नागरिकांना या नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. केंदाळ काढून खणींचे कायमस्वरूपी संगोपन करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

केंदाळावर प्लास्टिकचा थर 
शहापूर खणीलगत छोटे-मोठे उद्योगधंदे आहेत. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा थेट खणीत पडत आहे. प्लास्टिक पिशव्या व इतर आजूबाजूच्या कचऱ्याचे प्रमाण केंदाळाने व्यापलेल्या खणीत वाढले आहे. विस्तीर्ण केंदाळाच्या साम्राज्यावर प्लास्टिकचेही आक्रमण वाढत आहे. 

आंदोलन करू
नगरपालिकेकडे केंदाळ हटवण्याची मागणी केली; मात्र याकडे दुर्लक्ष झाले असून आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. पालिकेने योग्य उपाययोजना न केल्यास आंदोलन केले जाईल. 
- अक्षय चव्हाण 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT