shortage Repeat remedial injection in the kolhapur district
shortage Repeat remedial injection in the kolhapur district 
कोल्हापूर

तरतूद करताना नाकीनऊ  : रेमडेसिव्हर इंजेक्‍शनचा कोल्हापुरात पुन्हा तुडवडा

डॅनियल काळे

कोल्हापूर : कोरोना रुग्णांवर परिणामकारक उपचारात महत्त्‍वाची भूमिका असणाऱ्या रेमडेसििव्हर इंजेक्‍शनचा पुन्हा तुडवडा निर्माण झाला आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. यात रुग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहेत.


जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सर्वच यंत्रणेवर त्याचा ताण पडला आहे. औषध पुरवठ्यावरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. रेमडेसििव्हर इंजेक्‍शन प्रभावीपणे काम करत आहे. सुरवातीला जिल्हा परिषदेकडून हे इंजेक्‍शन रुग्णांना मोफत  दिले जात होते. नंतर हे इंजेक्‍शन सर्व खासगी औषध एजन्सीकडे उपलब्ध करण्याचे ठरले होते; पण कोरोनाचे रुग्ण वाढतील तसे इंजेक्‍शनला मागणी वाढत गेली. आता सर्वाधिक मागणी याच इंजेक्‍शनला आहे; पण या इंजेक्‍शनचा सध्या तुटवडा आहे.  

इंजेक्‍शनसाठी नातेवाईकांना ताटकळत बसावे लागत आहे. इंजेशक्‍नअभावी कोरोनाचा रुग्णाची दमछाक होत आहे. नातेवाईकांना हे इंजेक्‍शन मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचे प्राण धोक्‍यात आहेत. याबाबतीत प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात आणि इंजेक्‍शनचा पुरवठा तातडीने कसा होईल, याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे.

आर्थिक तरतूद करताना नाकीनऊ 
कोरोना महामारीच्या या काळात सर्वच टप्‍प्यावर रुग्ण आणि नातेवाईकांचे हाल होत आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रतीक्षा करावी लागत आहे. क्षमतेपेक्षा जादाचा आर्थिक भार पेलूनही योग्य उपचार मिळेनासे झाले आहेत. वैद्यकीय बिलापोटी अर्थिक तरतूद करताना नातेवाईकांच्या नाकीनउ येत आहे, तर दुसऱ्या बाजूला ऐनकेनप्रकारे पैसे उपलब्ध करून रेमडेसिव्हिरसारखे इंजेक्‍शनही उपलब्ध होत नसल्याने नातेवाईकांचा जीव कासावीस होत आहे.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT