Strict Inspection Of Vehicles At Check posts Kolhapur Marathi News
Strict Inspection Of Vehicles At Check posts Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चेकपोस्टवर वाहनांची कडक तपासणी 

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना सर्वच यंत्रणा गतिमान झाल्या आहेत. हातकणंगले निवडणूक शाखेने जिल्हा मार्गावर स्थिर निरीक्षण पथके उभारून वाहनांची कडक तपासणी सुरू केली आहे. तालुक्‍यातील किणी टोलनाका व इचलकरंजीतील पंचगंगा नदी पूल या दोन ठिकाणी चेक पोस्टवर वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. 

यंदाची पदवीधर व शिक्षक निवडणुकीची तीव्रता पाहता निवडणूक शाखेचे हातकणंगले तहसील कार्यालय सतर्क झाले आहे. मागील प्रत्येक निवडणुकीपेक्षा या वर्षीची पदवीधर व शिक्षक निवडणूक अटीतटीची ठरत आहे. आरोप प्रत्यारोपाने पुणे मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. मतदान अवघ्या दोन दिवसांवर आले असताना इतर निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीतील बेकायदेशीरपणा रोखणे निवडणूक शाखेसमोर आव्हान आहे. त्यादृष्टीने हातकणंगले तालुक्‍यातील किणी टोलनाका व पंचगंगा नदी पुलावर स्थिर पथके नेमून वाहनांमधून होणाऱ्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जात आहे. 

तालुका कार्यक्षेत्रात प्रवेश करणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. पैशाची वाहतूक, अवैध मद्य साठा, शस्त्रसाठा व संशयास्पद वस्तूवर विशेष वॉच ठेवला जात आहे. मतदानाची तारीख जवळ येईल तसे वाहनांच्या तपासणी कामाला वेग आला आहे. तीन सत्रात 9 कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाखाली चेकपोस्टवर वाहन तपासणीचे काम सुरू आहे. पथक प्रमुखाच्या निरीक्षणाखाली एक पोलिस व कर्मचारी तैनात आहेत. चेकपोस्टवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामकाजामध्ये निष्काळजीपणा न करण्याच्या सूचना संबंधित पथनिर्देशीन अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. 

चेकपोस्टवर तोकडी यंत्रणा 
चेकपोस्टवर दिलेल्या निर्धारित वेळेत संबंधित कर्मचाऱ्याने पूर्णवेळ काम करणे गरजेचे आहे. मात्र चेकपोस्टची स्थिती पाहता वाहन तपासणी करताना प्रमुख भूमिकेत असणारे पथक प्रमुख व व्हिडिओग्राफर गायब असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुसज्ज यंत्रणा तैनात करूनही नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चेकपोस्टवर यंत्रणा तोकडी दिसत आहे. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार: उद्धव ठाकरे

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Crime News: भर कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने जमिनीवर आपटलं; न्यायमूर्तीही झाले सुन्न

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Latest Marathi News Live Update : राहुल अन् प्रियांका गांधींनी देशाची माफी मागावी; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक

SCROLL FOR NEXT